चार जणांविरोधात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): ऊसतोडणीच्या उचलीचेपैसे का देत नाही? या कारणावरून एका मजुराचे शेतामधून अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी चौदा जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ आहे (राठोड) रा. ढेकणमोहा यांच्याकडे उचलीचे पैसे थकित होते. या पैशासाीं एकनाथ आडे यांना शेतातून उचलून नेण्यात आले. या प्रकरणी कैलास एकनाथ आडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राम माळी, गजानन चव्हाण, साबळे विठ्ठल कुंहलिक, सुरेश पाटील (रा. सर्व कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रॅक्टरला मोटारसायकल आडवी लावून चालकास तलवारीने मारहाण
गेवराई, (रिपोर्टर)ः-ऊस घेवून निघालेल्या ट्रॅक्टरला मोटार सायकल आडवी लावून चालकास तलवारीने मारहाण केल्याची घटना गेवराई जवळील बायपास पुलाजवळ घडली आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामभाऊ राठोड (रा.महाडुक तांडा राजपिंपरी ता.गेवराई) हे ऊसाचे ट्रॅक्टर घेवून गढी कारखान्याकडे जात असतांना बायपासच्या पुलाजवळ त्यांचे ट्रॅक्टर क्र.16ए.750 आडवून चालकास सुभाष राठोड, नवनाथ राठोड व अन्य दोघांजणानी तलवारीने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.