बीड (रिपोर्टर): अनेक कामचोर शिक्षक हे आपले शिकवणीचे काम सोडून शिक्षण विभागामध्ये पुढारपणा करत चकरा मारतात. ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेच्या वेळामध्ये कोण कोण शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक विभागात येतात यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
जे शिक्षक आपली शाळा सोडून जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद परिसरात फिरतात अशा शिक्षकांवर कारवाई करर्यासाठी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्यांनी संबंधित आलेला शिक्षक कोणत्या शाळेवर होता, त्याचे काम काय होते? इत्यंभूत बाबी तपासणी करून त्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांना द्यावयाचा आहे. जेणेकरून अशा शिक्षकांवर कारवाई करता येईल आणि बिनकामाच्या पुढारपण करणार्या आणि फुकटचा पगार लाटणार्या शिक्षकाला शिस्त लावण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी काकडे यांनी सांगितले.