मुख्य चौकासह इतर ठिकाणचे बॅनर काढले
बीड (रिपोर्टर): शहरामध्ये अनेक ठिकाणी अनाधिकृतपणे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर आज सकाळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचीन पांडकर यांच्या उपस्थितीमध्ये हटविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोड, जालना रोड, जिल्हा परिषद समोरील यासह आदी भागात बॅनर लावण्यात आले होते. हे सर्व बॅनर काढून घेण्यात आले.
शहरातल्या विविध भागात अनेक राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते वार्ड दिवसासह इतर बॅनर लावत असतात. या बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण तर होतच आहे मात्र काही ठिकाणी बॅनरमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. आज सकाळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक सचीन पांडकर यांनी रस्त्यावर उतरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोह, जिल्हा परिषद समोरील जालना रोड यासह इतर भागातले बॅनर हटवण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. बॅनर हटविल्यामुळे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.