मुख्याधिकार्यांचे आवाहन
बीड (रिपोर्टर): राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या गटातील नागरीकांचे सर्वे होत आहे. शहरातील कोणी सर्वेपासून वंचीत राहिले असेल तर त्याने नगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी निता अंधारे यांनी केले आहे.
23 जानेवारी 2024 पासून मराठा समाज व खुल्या गटातील नागरीकांचा सर्वे सुरू आहे. सदरील हा सर्वे 2 फेब्रुवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. शहरातील नागरीकांचे सर्वेक्षण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा नोडल अधिकारी निता अंधारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सम्राट कदम यांंच्या मार्गदर्शनाखाली 13 समन्वयक, 26 पर्यवेक्षक आणि 508 प्रगणकांमार्फत सर्वे करण्यात येत आहे. 2 फेब्रुवारी ही सर्वेची शेवटची तारीख आहे. शहरातील मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचा सर्वे पुर्ण झाला आहे. ज्या कुटुंबाचा सर्वे नजरचुकीने असेल तर त्यांनी 2 फेब्रुवारीपर्यंत अमोल बडगुजर (मो. नं. 9890561139), चंद्रकांत सखाहरी काळे (मो. 8668396125) कार्यालयीन अधिक्षक तिडके (8605045333, 99224554161), वसुली अधिक्षक यांच्याशी संपर्क साधावा. अशा राहिलेल्या कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यासाठी नगर परिषदेची टीम येऊन सर्वेक्षण पुर्ण करण्यात येईल, असे न.प.च्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी म्हटले आहे.