नेकनूर (रिपोर्टर)ः- नेकनुरच्या स्त्री रूग्णालयामध्ये रात्री एका दारूड्याने चांगलाच गोंधळ घातला. कर्मचार्यांना शिवीगाळ करत रूग्णालयाच्या काचा फोडल्या. सदरील दारूड्या विरोधात नेकनुर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री नेकनुरच्या स्त्री रूग्णालयामध्ये एका मद्यपीने प्रवेश करत महिला व इतर कर्मचार्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्या दारूड्याने रूग्णालयाच्या काचाची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान आज सकाळी प्रकाश बन्सी शिंदे याच्या विरोधात नेकनुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.