बीड (रिपोर्टर): शहरातील अंकुशनगर भागामध्ये नगर परिषदेची पाण्याची टाकी बांधण्यासाठी दानकर्त्याने संबंधित जागा ही दान केलेली आहे. तिचा मावेजाही दानकर्त्याने घेतला नसल्याचे सांगण्यात येते. लोकांच्या मागणीवरून रहदारीसाठी त्याठिकाणी रस्ता होत असून याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असल्याचे याभागातील अनेकांचे सांगणे आहे. त्यामुळे सदरचा रस्ता होणे विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण असल्याचे बोलले जाते.
बीड शहरातील अंकुश नगर भागात पाण्याच्या टाकीजवळ रस्त्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते. सदरचे रस्त्याचे काम हे नगरपालिकेच्या जागेतून होत असल्याचा आरोप मध्यंतरी झाला. तो रस्ता प्लॉटिंग व्यवसायिकाने स्वत:च्या जागेतून करावा, असेही सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात जेव्हा पाण्याच्या टाकीची जागाच नगरपालिकेला दान देण्यात आल्याचे समोर आले आहे. दानकर्त्याने नगरपालिकेकडून कुठलाही मावेजा घेतला नसल्याचे सांगण्यात येते. मात्र जो रस्ता सुरू आहे त्या रस्त्यामुळे या भागातील नागरिकांना चांगली मदत होईल, असेही सांगितले जाते. सदरचा रस्ता हा दर्जेदार होत असून या भागातील रहदारीचा तो चांगला मार्ग बनणार असल्याचेही सांगण्यात येते.











