• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

 प्रखर -याला काँग्रेसचं दोषी

by गणेश सावंत
February 20, 2024
Reading Time: 1 min read
0
 प्रखर -याला काँग्रेसचं दोषी
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

काँग्रेसचा कोणता नेता कधी भाजपाच्या गळाला लागेल हे सांगता येत नाही. निष्ठा, विचार सगळं काही नेत्यांनी खुंटीला गुंंडाळून ठेवले. आता कुणी विचार आणि निष्ठेबाबत बोललं तर त्याची भीतीच वाटू लागली. राज्यातील आणि देशातील काँग्रेसला गेल्या अनेक वर्षापासून गळती लागलेली आहे. ही गळती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जास्तच लागली. एकीकडे राहूल गांधी यांची यात्रा सुरु आहे. दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते भाजपाच्या दारात जावून ’आम्हाला आत घ्या म्हणत’ आहेत, तर काही नेत्यांना भाजपा फोडत आहे. फोडाफोडी भाजपाच्या पथ्यावर पडू लागली. भाजपाला लोकसभेच्या 370 जागा जिंकायच्या आहेत. दुसर्‍याचं घरं फोडून भाजपाला जागा जिंकायच्या आहेत. भाजपातील 30 टक्के नेते काँग्रेस व इतर पक्षातील आहेत. काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेवून भाजपा आपल्या पक्षातील निष्ठावंताला थोडं थांबाचा इशारा देत आहे. आपण पक्षासाठी इतकं सगळं करतोत आणि ऐनवेळी मलिदा दुसरास कुणी तरी लाटत आहे याची सल भाजपाच्या निष्ठावंताना नसेल का? राज्यसभा असेल किंवा विधान परिेषद यामध्ये बाहेरहून आलेल्या नेत्यांचेच वर्चस्व दिसत आहे. एकेकाळी काँग्रेसचे एक हाती वर्चस्व राज्यातच नव्हे तर देशात होते. आज काँग्रेसला कार्यकर्ते शोधण्याची वेळ आली.


प्रस्थापितांचा लाड
स्वातंत्र्यापुर्वीपासून काँग्रेस पक्ष आहे. स्वातंत्र्यांनतर जे लोक कॉँग्रेसमध्ये होते. त्यांनी अनेक वर्ष राजकारणात आपले पाय घट्ट रोवून ठेवले. कॉग्रेसने प्रस्थापिता व्यतिरिक्त इतरांना कधीच संधी दिली नाही. फक्त प्रस्थापीत मंडळी पोसण्याचे काम केले गेले. ग्रामपंचायतीपासून ते अगदी लोकसभेपर्यंत एकाच कुटूंबाकडे सत्तेची चावी होती. कार्यकर्ते फक्त सतरंज्या उचलण्याचं आणि झेंडे धरण्याचे काम करत होेते. राज्यात आणि देशात जे काही प्रास्थापित आहेत. त्यांचा जुना इतिहास तपासून पाहितला तर असं दिसून येईल की, त्यांच्या घरात कशा पध्दतीने राजकारण मुरत होते. सत्तेच्या माध्यमातून कॉग्रंेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी शाळा, महाविद्यालय, साखर कारखाने, सुत गिरण्या इत्यादी मोठा पसारा वाढवून ठेवला. त्यातून ते वर्षानुवर्ष राजकारण करत होते. काहींनी सहकार क्षेत्र पुर्णंता: खाल्लं तरी त्याचं काहीच झालं नाही. कारण सत्तेच्या खुर्चीवर कॉग्रेस होती. 2014 आणि 1995 चा कार्यकाळ सोडला तर आज पर्यंत काँग्रेसचं राज्य होतं. शरद पवार काँग्रेसमधून फुटल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. पवारासोबत जे, जे नेते आले होते. ते सगळे कॉग्रंेस पक्षाचेच होते. त्यातील काहींनी आता भाजपाचा रस्ता पकडायला सुरुवात केली. खावून पिवून ढेकरं देण्याचं काम सध्याच्या राजकारणात सुरु आहे.


आता ते आदर्श ठरतील!
मिलींद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेला सोडलं. देवरा कुटूंब हे जुने काँग्रेसचे नेते आणि अनेक वर्ष ते या पक्षात होते. काँग्रेसच्या जीवावर ते मोठे झाले. त्यांना यावेळी उमेदवारी मिळत नाही म्हणुन की, निवडुन येत नाही म्हणुन त्यांनी कॉग्रंेसला सोडचिट्टी देवून भाजपात प्रवेश केला? मिलींद यांना त्यांच्या वडीलाकडून राजकारणाचा वारसा आला. प्रत्यक्षात त्याचं पक्षासाठी तितकं योगदान नाही. पक्षानेही डोळे झाकून त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं होतं. ते खासदार झाले होते. देवरा यांच्या ऐवजी पक्षाला दुसरा कॉग्रेसचा कार्यकर्ता दिसला नाही? आता देवरा यांची गरज संपली त्यामुळे त्यांनी आपला पुढचा मार्ग निवडला. देवरा यांच्या सारखाचा निर्णय बाबा सिद्दीकी यांनी घेतला. सिद्दीकी हे तीन वेळा आपल्या मतदार संघातून निवडून येत आहे. त्यांना पुढे कॉग्रंेसमध्ये अंधार दिसून आला असेल म्हणुन त्यांनी काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी कॉग्रंेसला सोडलं. चव्हाण यांना दोनदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळालेली आहे. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यामुळे अशोक चव्हाण यांना मोठा वंारसा आहे. सगळी ह्यात त्यांची काँग्रेसमध्ये गेली. तरी त्यांनी पक्ष सोडला. आदर्श घोटाळ्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं. भाजपाने त्यांच्यावर त्या वेळी त्यांच्याविरोधात मोठं रान उठवलं होतं. आता त्याच भाजपाने त्यांचा सन्मान केला. त्यांचा आदर्श घोटाळा आता कधीच बाहेर निघणार नाही. उलट भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देवून आपल्या पक्षातील कोणाचा तरी बळी दिला. चव्हाण यांच्या ऐवजी कुणी तरी भाजपातील निष्ठावंत राज्यसभेच्या लाईनमध्ये थांबलेलं असेल. त्यांना डावलून चव्हाण यांना उमेदवारी दिली. या उमेदवारीमुळे भंाजपाच्या माधव भंडारी यांच्या मुलाने  आपल्या पित्याला उमेदवारी मिळाली नसल्याने प्रश्‍न उपस्थित केला? म्हणजे भाजपातील निष्ठावंतात खदखद आहे. जो भाजपात जाईल. तो अगदी धुतल्या तांदळा सारखा स्वच्छ होवू लागला. चव्हाणांचा आदर्श घोटाळा आता भाजपाला तो आरोप वाटू लागला. तशी प्रतिक्रिया भाजपातून आल्या. आरोप होता तर मग भाजपाने इतकं मोठं रान उठवायची गरजच नव्हती? भाजपाने दुतोंडीपणाचं राजकारण सुुरु केलं. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांची मुलगी विधानसभेच्या रेसमध्ये आहे. त्या मतदार संघातील इतर भाजपाच्या कार्यर्त्यांनी फक्त बघतच बसायचं का? नांदेडमध्ये चव्हाण यांच्याशिवाय कॉग्रंेसने इतरांचा विचारच केला नाही. इतर कार्यकर्त्यांना संधी दिली असती तर ही नामुष्की पक्षावर आली नसती.


जेलमध्ये जाण्याची भीती
सत्तेचा वापर कसा करायचा हे सत्ताधार्‍यावर अवलूंबन असतं. ईडी, सीबीआयच्या धाडी अनेकांच्या घरात, मालमत्तेवर पडल्या. त्यामुळे काही राजकीय पुढारी प्रचंड घाबरुन गेले. उद्या आपला ही नंबर लागतो की काय याची त्यांना धास्ती असावी. आपण भाजपात गेलो की, काहीच होत नाही. असाच समज नेत्यांचा होवू लागला. काँग्रेसचे पुर्वीचे नेते हर्षवर्धन पाटील यांना सध्या चांगली झोप येत असेल. त्यांनी काही महिन्यापुर्वी म्हटलं होतं. ’मी सध्या निवांत झोपत आहे’. पाटील यांच्या नंतर नगरचे विखे देखील भाजपात गेले. विखे यांचा मोठा राजकीय दबदबा आहे. त्यांच्याकडे काही चुकीची कामे झालेली असतील किंवा कर बुडवणे म्हणा, नाही तर मंत्रीपदाच्या कार्यकाळात भ्रष्टाचार केलेला असेल तो उघडयावर येवू नये म्हणुन त्यांनी विरोधी पक्ष नेता असतांना  भाजपात प्रवेश केलेला आहे. ते सध्या राज्याचे महसूल मंत्री आहेत. त्यांना भाजपाने महत्वाचं खातं देवून त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे. महसूल खातं पुर्वी चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं, हे खातं दोन नंबरच आहे.  पाटील याचं महत्व कमी करुन विखे यांना त्याचं खातं दिलं. सध्या चंद्रकांत पाटील जास्त चर्चेेत नसतात. त्याना साईट खातं देण्यात आलेलं आहे. भाजपाला घराणेशाहीची चिड आहे, पण आपल्या पक्षात आलेले घरंदाज नेते त्यांना पसंद आहे. राधाकृष्ण विखे मंत्री असतांना त्यांचा मुलगा सुजय विखे खासदार आहे. एकाच घरात दोन, दोन पदे कशी? दोन दिवसापुर्वीच मोदी यांनी कॉग्रेस घराणेशाहीचा पक्ष म्हणुन उल्लेख केला. काँग्रेसमधीलच घराणेशाही भाजपात येत आहे हे कसं काय? निवडणुकीच्या आधी आणखी किती जण जेलमध्ये जाण्याच्या भीतीने भाजपात जातात हे दिसून येईल. आर्धी काँग्रेस आपल्याकडे येईल असा दावा भाजपाकडून केला जात आहे. विरोधात कुणी राहतं की, नाही असं वाटू लागलं. सगळेच भाजपात गेल्यावर भाजपा नेमकं तिकीट कोणा, कोणाला देणार?


भाकर फिरवली नाही
भाकर फिरवली नाही तर ती करपते, पण काँग्रेसेने आज पर्यंत एकाच तव्यावर एकच भाकर टाकली. त्यामुळे कॉग्रंेसला  वाईट दिवस पाहावे लागू लागले. काँग्रेसमध्ये नेते फक्त सत्तेचा लाभ उचलत राहिले. वीस वर्षात  लाभार्थी नेत्यांनी कॉग्रेसला वाढवले नाही. निवडणुका आल्या की, नेत्यांनी हायकमांडच्या पुढे, पुढे करायचं आणि उमेदवारी पदरात पाडून घ्यायची असा धंदा केला. हायकमांडला कधी वाटलं नाही. सामान्य कार्यकर्त्याचा थोडा विचार करावा? पक्षाच्या कार्यकारणीवर पुढार्‍यांचीच मुले नियुक्ती केली जात आहेत. सगळंच बड्या नेत्यांच्या पदरात टाकायचं, म्हणजे रात्र, दिवस पक्षासाठी खस्ता खाणारे वेडेच म्हणावे लागतील? काँग्रेसमध्ये पक्ष वाढवण्याची एक शिस्त होती. पक्ष वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रम, शिबीरे घेतली जात होते आज हे पुर्णंत: बंद आहे. फक्त दुसर्‍यांना नावे ठेवून पक्ष वाढत नसतो. फिल्डवर काम करणं महत्वाचं असतं. आज पर्यंत विधानसभा, लोकसभा, राज्यसभा,विधानपरिषद याची उमेदवारी किती सामान्य कार्यकर्त्यांना दिल्या? याचं चिंतन पक्षाने करायला हवं? आज संकटाच्या काळात पक्षाला नेत्यांची गरज आहे. मात्र प्रस्थापित नेते भाजपात जात आहे, हा पक्षाच्या विचाराचा पराभव आहे. कॉग्रेसच्या विचाराचे नेते पक्के असते तर त्यांनी इतर पक्षात स्वार्थासाठी उड्या मारल्या नसत्या,  नेत्यानंा फक्त सत्ता हवी आहे. ते सत्तेचे भोक्ते आहेत. भाजपात गेल्या नंतर कॉग्रंेसच्या नेत्यांनी म्हणुन नये, कॉग्रंेसने इतक्या वर्षात काय केलं? इकडून, तिकडे पळणार्‍या नेत्याबद्दल लोकात थोडीही सहानुभूती नाही. कॉग्रेस हायकमांडने वेळीच भाकरी फिरवण्याचं काम केलं असं तर आज हे दिवस पाहण्याची वेळ आली नसती. काँग्रेसला बुडवण्याचं काम काँग्रेसचे लाभार्थीच करु लागले हे पाप कॉग्रंसेचचं आहे. सामान्य कार्यकर्ता मात्र बेईमान झाला नाही हे विशेष आहे. 

Previous Post

मराठ्यांना शिक्षण व नोकरीत 10 टक्के आरक्षण विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

संबंधित बातम्या

बीड

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

by गणेश सावंत
October 12, 2026
अग्रलेख

कटाक्ष – चक्रव्यूह

by गणेश सावंत
September 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
बीड

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक; १.९१ कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त

by गणेश सावंत
August 7, 2026
Next Post
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार

ताज्या बातम्या

ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!

October 12, 2026

अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?

October 11, 2026

अग्रलेख -सत्तेचा रेडा

September 27, 2026

कटाक्ष -दुष्काळवाड्यात अतिरेकी?की व्यवस्थेचा अतिरेक?

September 24, 2026

मराठवाडा जळतोय…. सरकार बोलतंय ! आता शब्द नकोत, पाण्याचा थेंब द्या

September 20, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • ऑनलाइन पटसंख्येतील कथित हेराफेरीप्रकरणी मुख्याध्यापक जोशी निलंबितबीडच्या चंपावती शाळेतील गैरप्रकारांचा पर्दाफाश!
  • अग्रलेख – नंगानाचं पण कुणाचा?
  • अग्रलेख -सत्तेचा रेडा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?