बीड (रिपोर्टर): अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना आज पहाटे अहमदनपूर, अहमदनगर महामार्गावर असलेल्या लिंबागणेश येथे घडली.
गणेश एकनाथ भोसले (वय 25, रा. पिंपळवंडी) असे या युवकाचे नाव आहे. पहाटे काही ग्रामस्थ फिरायला जात असताना लिंबागणेश येथील हॉटेल गारवाच्या समोर रस्त्याच्या कडेला गणेशचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी नेकनूर पोलिसांना दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे, गोविंद राख, लिंबागणेश पोलीस चौकीचे हे.कॉ. संतोेष राऊत, बाबासाहेब डोंगरे, नवनाथ मुंडे यांनी भेट देऊन स्थळ पंचनामा केला. हॉटेल गारवासमोर असलेल्या सिसीटीव्हीमधील फुटेज तपासण्याचे काम सुरू असून मध्यरात्री अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत या तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.












