नेकनूर (रिपोर्टर): 19 वर्षीय तरुणीच्या घरामध्ये घुसून तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आला. यातून पिडिता 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील ही अत्याचाराची घटना ठाणे येथे घडली आहे. पिडिता नातेवाईकांकडे नेकनूर येथे आली असता तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर ती गर्भवती असल्याचे सांगण्यात आले.
ठाणे येथील इंदिरा नगर संसार बेकरीच्या पाठीमागे राहणार्या एका 19 वर्षीय तरुणीच्या घरामध्ये मुकेश चव्हाण याने जबरदस्तीने घुसून तिच्यावर अत्याचार केला. सदरील ही अत्याचाराची घटना 2023 ऑक्टोबरच्या दरम्यान घडलेली आहे. मुकेश चव्हाण हा सतत या तरुणीवर अत्याचार करत होता. पिडिता काही दिवसांपूर्वी नेकनूर येथे आपल्या नातेवाईकांकडे आली असता तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला डॉक्टराकडे दाखवण्यात आले. डॉक्टराने तपासणी केली असता पिडितेच्या पोटात चार महिन्याचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले. आपल्यावर मुकेश चव्हाण याने अत्याचार केल्याचे पिडितेने नातेवाईकांसह पोलीस प्रशासनाला सांगितले. त्यानुसार आरोपी मुकेश चव्हाण याच्यावर नेकनूर पोलीस ठाण्यात कलम 376 (2), 452, 506, 507 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












