कारवाई करण्याची केली मागणी
नेकनुर, (रिपोर्टर)ः-नेकनुरच्या आठवडी बाजारामध्ये आठ दिवसाला मोठी उलाढाल होत असते. याठिकाणी इतर ठिकाणाहून व्यापारी येत असतात. नेकनुर ठाण्याचे पोलिस कर्मचारी बांगर व्यापार्यांना जाणीवपुर्वक त्रास देवून त्यांनाशिवीगाळ करत आर्थिक मागणी करत असतात. आज पुन्हा त्यांनी व्यापार्यांना दादागिरी केल्याने संतप्त व्यापार्यांनी पोलिस ठाण्यात जावून बांगर यांच्यावर कारवाईसाठी अधिकार्यांना घेराव घातला होता. आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधीत अधिकार्यांना देण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासुन बांगर नेकनुर ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. ते नेहमीच नागरीकांशी व्यवस्थीतपणे वागत नाहीत. आठवडी बाजारात व्यापार्यांना त्रास देतात, पैशाची मागणी करतात. पैसे न दिल्यास गुन्हे दाखल करण्याची धमकी देतात. आज पुन्हा त्यांनी व्यापार्यांना त्रास दिल्याने संतप्त व्यापार्यांनी पोलिस ठाण्यात जावून अधिकार्यांना घेराव घालत बांगर यांच्या विरोधात आक्रमक पवित्र घेतला. बांगर यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.












