बीड (रिपोर्टर)ः- व्यवसायाने शासकीय नोकरीत अभियंता पदावर असतांना एका महिले सोबत प्रेमाचे संबध निर्माण केले. अनेक वर्ष प्रियसीसोबत मधुर संंबंध असतांना या संबधात मध्येच मिठाचा खडा पडला आणि सबंध विकोपाला गेले. यातून या बिघडलेल्या सबंधातून प्रियसीच्या नावे असलेली मालमत्ता बनावट कागदपत्राआधारे या प्रियकराने बायकोच्या नावे केली. प्रियसिच्या फियादीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये अभियंता असलेल्या प्रियकरांवर आणि त्यांच्या पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
विद्यागर नावाच्या अभियंत्याने प्रियसीचे नाव आणि बायकोचे नाव एकच असलेले सरकारी राजपत्र तयार केले. या राजपत्राआधारे प्रियसी आणि बायको यांच्या जरी दोन नावे असले तरी या दोन नावाच्या एकच व्यक्ती आहेत अशा सरकारी राजपत्राआधारे प्रियसीच्या नावावर असलेल्या मालमत्तेचे रजिस्ट्रीचे कागदपत्र गोडी गुलाबीने तिच्याकडून आणले. त्यानंतर या मालमत्तेचा पि.टी.आर आणि पि.आर.ला आपल्या पत्नीचे नाव लावले. हे नाव लावतांना रजिस्ट्री ऑफीस मध्ये बनावट सही ही केली. हे जेव्हा प्रियसिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने बीड शिवाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये त्या अनुषंगाने छाया हरिशचंद्र विद्यागर, आणि हरिशचंद्र मारोती विद्यागर रा. तक्षशिला नगर, भगवान विद्यालयाच्या पाठीमागे या दोघांवर भादवी कलम 419, 420, 465, 468, 471,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.