तहसील कार्यालयासमोरूनही गाडी चोरीला
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या. त्यातच मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे एका पोलीस कर्मचार्याने आपल्या घरासमोर आपली मोटारसायकल उभी केली होती. अज्ञात चोरट्याने सदरील ही मोटारसायकल चोरून नेली. पोलीस कर्मचार्यांच्याच गाड्या चोरीला जात असतील तर इतरांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चोरी प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातून दररोज एक-दोन गाड्या चोरीला जात आहेत. गाड्या चोरणारी टोळी सक्रिय असल्याचे दिसून येते. इतरही चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत. पोलीस हवालदार सर्जेराव बाजीराव वनवे यांनी आपली मोटारसायकल (क्र. एम.एच. 23 बी.बी. 3347) ही नायगाव येथील आपल्या निवासस्थानासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने संधीचा फायदा घेऊन रात्री सदरील मोटारसायकल चोरून नेली. या प्रकरणी वनवे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी मोटासायकल चोरीची घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. शेख अजीम शेख असगर (रा. पाली) यांनी आपली मोटारसायकल क्र. एम.एच. 23 बी.जे. 5784 ही तहसील कार्यालयासमोर उभी केली होती. सदरील ही गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.