बीड (रिपोर्टर): शहरातील सय्यद अलीनगर भागातील रस्त्याचे अर्धवट काम झाले. सदरील काम पुर्ण करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी माजी सभापती शेख बिस्मिल्लाह यांच्यासह आदींचे नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.
वॉर्ड क्र. 21 सय्यद अलीनगर या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र सदरील काम पुर्ण झालेले नाही. त्याचबरोबर बाजुच्या नालीचे काम तात्काळ सुरू करावे यासह इतर मागण्यांसाठी हाफेज अशफाक, सय्यद बिस्मिल्लाह यांच्यासह आदींचे नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.