बीड, (रिपोर्टर)ः- किरकोळ कारणावरून मारामारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. शेतींचा बांध असेल किंवा उसने पैसे असतील नाहीतर कुठलेही किरकोळ कारण असेल यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये मारामारीच्या घटना घडू लागल्या आहेत. गेल्या 24 तासामध्ये बीड जिल्ह्यात 7 मारामारीच्या घटना घडल्या असुन या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात 12 पेक्षा जास्त लोकांविरोधात गून्हे दाखल करण्यात आले आहेत.
अंबोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाघळुज येथे शेतातील बाभळीच्या झाडाच्या फांद्या तोडल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यामध्ये आप्पा रघुनाथ गटकळ (रा.वाघळुज) यांना मिट्टु भानुदास गटकळ, गणेश गटकळ, अमोल गटकळ, शोभा गटकळ यांनी संगनमत करून मारहाण केली आहे. या मारहाणीत ते जखमी झाले असुन संबंधिताविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी मारहाणीची घटना आष्टी तालुक्यात घडली. सुरेश रामलिंग पानसांडे (रा.ब्रम्हगाव) यांना प्रदिप प्रल्हाद ढोबळे व इतर अन्य लोकांनी पैशाच्या कारणावरून मारहाण केली. चार वर्षापुर्वी लग्नात काढलेल्या फोटोचे पैसे राहिल्याने वाद निर्माण झाला. यातच आरोपीने फिर्यादी व साक्षीदार यास मारहाण केली. त्यामुळे सुरेश पानसांडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तिसरी मारहाणीची घटना चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड जळगाव येथे घडली. सामायीक बोअरच्याकारणावरून वाद निर्माण झाला. या वादातुन प्रल्हाद सोनाजी खोसे यांना परमेश्वर खोसे, रामेश्वर खोसे, माऊली खोसे यांनी संगनमत करून मारहाण केली. चौथी मारहाणीची घटना धारूर तालुक्यातील बरडवस्ती मोरफडी शिवारात घडली. तोफा वाजविण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे सुभाष निवृत्ती शिंदे या रिक्षा चालकास अक्षय गडदे, रितेश गडदे, परमेश्वर गडदे, बाळु गडदे यांनी मारहाण केली. पाचवी मारहाणीची घटना परळी शहरात घडली. नळाच्या पाण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला या वादातुन पार्वती कोटुळे यांना सिध्देश्वर खंडागळे यांने शिवीगाळ करत नाकावर दगड फेकून मारला. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहावी मारहाणीची घटना अंबाजोगाई येथे घडली. भावाच्या सासरवाडीत भावाकडे पैसे मागण्यासाठी गेलेल्या मोसीन अब्दु गणी शेख (रा.गवळीपुरा अंबाजोगाई) यास इसुब इब्राहीम शेख, खैरोनिसा उर्फ नितीन युसूफ शेख, मसुब युसूब शेख (रा.अजमेर नगर अंबाजोगाई) यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीच्या घटना 24 तासात घडलेल्या आहेत.