बीड (रिपोर्टर): फळबागाचे मस्टर तू का काढत नाही ? या कारणावरून दोघा जणांनी ग्रामरोजगार सेवकास मारहाण केल्याची घटना पेंडगाव येथे घडली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम उमराव दांगट हे पेंडगाव येथे ग्रामरोजगार सेवक आहेत. सदरील ग्रामरोजगार सेवकास प्रकाश सूर्यभान चव्हाण व पांडुरंग वामन धट या दोघांनी बोलावून घेत तू आमचे रोजगार हमी योजनेतील फळबागांचे मस्टर का काढत नाही? या कारणावरून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दांगट यांच्या फिर्यादीवरून प्रकाश चव्हाण व पांडुरंग धट या दोघा जणांविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.