केज (रिपोर्टर): केज नगरपंचायतमध्ये कर्मचार्यांचा तुटवडा असल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. शहराची लोकसंख्या चाळीस हजार असून या लोकसंख्येचे कामकाज फक्त सात कर्मचार्यांवर चालत आहे. प्रभारी मुख्याधिकारी गुट्टे हेही कार्यालयात कधीमधीच उपस्थित राहत आहेत. ते कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्यांची अडवणूक होऊ लागलीय.
शहराची लोकसंख्या 40 ते 50 हजाराच्या घरात आहे. नगरपंचायत कार्यालयामध्ये कर्मचार्यांचा तुटवडा असल्याने लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. फक्त सात कर्मचारी नियमीत आहेत. हे कर्मचारी जास्तीचे काम करूएन वैतागले आहेत. प्रशासकीय पातळीवर जागा भरल्या जात नसल्याने कर्मचार्यांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. प्रभारी मुख्याधिकारी म्हटून गुट्टे यांची नियुक्ती झालेली आहे, ते देखी वेळेवर हजर राहत नाहीत. नागरिकांना पीटीआरसह इतर कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने आठ-आठ दिवस लोकांना चकरा मारण्याची वेळ येऊ लागली आहे. दरम्यान कर्मचार्यांची नियुक्ती करावी आणि कामकाजात सुसुत्रता निर्माण करण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.