बीड (रिपोर्टर): धारूर येथील कब्रस्तानामधील कबरी तोडून विटंबणा केल्या प्रकरणी दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे.
सर्वे नं. 622, 623/अ व 623 येथील प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिलेले असताना मुस्लिम समाजाच्या पुर्वजांच्या कब्रस्तानमधील कबरी तोडून विटंबणा करण्यात आली असून या प्रकरणी दोषींविरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे. या वेळी सय्यद फेरोज कासम, मुनीर छोटुमियॉ सय्यद, अलीम नवाब शेख, सिराज अहमद शेख, असद जिलानी कुरेशी, शेख रहीम जब्बार यांच्यासह आदींचा सहभाग आहे.