तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सच्या खिडक्या उघडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरटे करत होते. या चोरट्यांची विचारपूस केली असता सदरील चोरटे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र धाबा मालकाने व अन्य काही नागरिकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यातील एकाने पकडणार्यांचा चावा घेतला. ही घटना बळीराजा धाब्यासमोर घडली. या प्रकरणी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंझेरी फाट्यानजीक बळराजा धाब्यासमोर आनंद ट्रॅव्हल्स उभी होती. या ट्रॅव्हल्सच्या खिडक्या उघडून संशयित चोरटे आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना बाळु आश्रुबा कारगुडे (हॉटेल व्यावसायिक) यांनी हाटकले असता सदरील हे संशयित चोरटे ह्युंडई क्रेटा (क्र. ए.पी. 39 आर.एस. 4797) मधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना बाळु कारगुडे व इतरांनी पाठलाग करून पकडले. पकडणार्यास आरोपी बाबू अहमद खान याने चावा घेतल्याने ते जखमी झाले. या प्रकरणी बाबू अहमद खान, मुश्ताक खान जमालू (रा. मध्य प्रदेश) व अन्य एक अशा तिघा जणांविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












