परळी मतदारसंघात 6 कोटी पेक्षा अधिक तर बीडच्या मन्सूर शहावली दर्ग्याच्या विकासासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर
धनंजय मुंडेंकडून परळी मतदारसंघातील बागझरी, घाटनांदुर, बर्दापूर, जिरेवाडी, नाथरा, मांडवा, गाडे पिंपळगाव, कन्हेरवाडी यासह बीडच्या मन्सूर शहावली दर्ग्याच्या विकासासाठी दिलेल्या शब्दाची पूर्तता
मुंबई (दि. 12) – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विविध देवस्थानांचा व तीर्थ स्थळांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी आज प्रादेशिक पर्यटन योजनेतून 24 कोटी 66 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असून, या निधी खर्चास शासनाच्या वतीने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या रकमेतून परळी मतदारसंघातील विविध देवस्थाने व तीर्थस्थळांच्या विकासासाठी 6 कोटी पेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला असून बीड शहरातील मन्सूर शहावली दर्ग्याच्या विकासासाठी एक कोटी रुपये तसेच बीड शहरातील संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या विकासासाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
ही आहे प्रस्तावित कामे
परळी मतदारसंघ – श्री दत्त मंदिर देवस्थान बागझरी 50 लक्ष, श्री सोमेश्वर देवस्थान घाटनांदुर 50 लक्ष, गणपती देवस्थान बर्दापूर 1 कोटी, श्री सोमेश्वर देवस्थान जिरेवाडी 50 लक्ष, पापनशेश्वर मंदिर नाथरा 1 कोटी, काळभैरव देवस्थान मांडवा 50 लक्ष, महादेव मंदिर तपोवन 50 लक्ष, पापदंडेश्वर देवस्थान गाडेपिंपळगाव 50 लक्ष, कन्हेरवाडी येथील अष्टविनायक गणपती मंदिरासाठी 1 कोटी 16 लक्ष. या व्यतिरिक्त बीड शहरातील मन्सूर शहावली दर्गा 1 कोटी, संत भगवान बाबा प्रतिष्ठान 1 कोटी, यांसह बीड, आष्टी, केज आदी मतदारसंघात एकूण 24 कोटी 66 लक्ष रुपयांच्या कामांना निधी उपलब्ध करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.