प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांची कारवाई
बीड (रिपोर्टर)ः- आपल्या मुख्याध्यापकाला दारू पिऊन धिंगाना घालत मारहाण करणार्या दोन शिक्षकावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांनी केली.
गेवराई तालुक्यातील शेकटा येथील प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक यांच्यात काही कारणास्तव वाद झाला होता. या वादातून शाळेचे मुख्याध्यापक नारायणकर यांना संतोष गिरी आणि नागरगोजे या दोन शिक्षकांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली होती. या मारहाणी बाबत नारायणकर यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने दोन शिक्षकांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. शाळेतील शिक्षकांनी मुुख्याध्यापकाला मारहाण करणे जातीवाचक शिवीगाळ करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असुन याची दखल प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यांनी तात्काळ घेतली आणि संतोष गिरी आणि नागरगोजे या दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करत त्यांना निलंबन काळात आष्टी पंचायत समितीला हाजरी लावण्याचे आदेश ही लावले.












