बीड (रिपोर्टर): मार्च एन्ड असल्यामुळे जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी पुर्णपणे खर्च झाला पाहिजे, यासाठी राज्य सरकारने शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस सुट्ट्या असल्या तरी शासकीय कार्यालये सुरू ठेवून निधी खर्च करण्याचे आदेश दिलेले आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे नवीन कामांना मंजुरी देता येत नसली तरी प्राप्त झालेल्या योजनेचा निधी खर्च करण्यासाठी रात्री उशीरापर्यंत ही कार्यालये सुरू आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गतची 1261 कामे सुरू आहेत. या कामांसाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, गेल्या वर्षभरात शिक्षण विभागामध्ये वैद्यकीय परिपुर्तकी बिले, रजा कालावधीची बिले यासाठीही मोठा निधी कधी नव्हे ते बीड जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वस्तीगृहासाठीही 5 ते 7 कोटी रुपयांचा निधी आलेला आहे आणि बांधकाम विभागाच्या 25-15 या हेडसाठीही कोटट्यवधी रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. या दोन्ही तिन्ही विभागासोबतच महिला बालकल्याण विभाग, रोजगार हमी योजना विभाग या योजनेसाठी काम करणारे अधिकारी, कर्मचार्यांनी रात्री उशीरापर्यंत जागून योजनेचा निधी खर्च करण्यासोबतच लाभार्थ्याच्या खात्यामध्ये 31 मार्चपर्यंत निधी वर्ग झाला पाहिजे यासाठी वित्त तथा लेखा विभागाचे मुख्य वित्त लेखाअधिकारी केंद्रे हे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांच्या आदेशाने निधी खर्च करत आहेत. जलजीवन मिशन योजनेअंतर्गतही कार्यकारी अभियंता आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या हातावर असलेल्या फाईली हाता वेगळ्या करत आहेत. त्यामुळे उद्या संध्याकाळी उशीरापर्यंत कार्यालये आणि जिल्ह्यातील बँका, लेखा कोषागार कार्यालय हे सुरू आहेत.












