वडीगोद्री : लोकसभा निवडणूक व उमेदवारी या बाबत मराठा समाज बांधवाची बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मार्गदशनाखाली शनिवार (ता. 30) रोजी अंतरवाली सराटी येथे सकाळ पासुन सुरु झाली आहे. या ठिकाणी राज्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत.
या बैठकीत राज्यातील 36 लोकसभा मतदासंघाचे अहवाल मनोज जरांगे यांना मिळाले असून त्याचे वाचण व अभ्यास मनोज जरांगे करत आहेत. पुणे लोकसभा निवडणूककरिता वसंत मोरे व सहकारी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले असुन ते मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. वसंत मोरे हे जरांगे यांना पुणे लोकसभा मधुन आपल्याला उमेदवारी द्यावी करीता भेट घेणार आहे जरांगे यांच्या सोबत भेटल्यावर ते या बाबत माहिती देणार आहे. आजच्या या बैठकीत निवडणूक लढवणे , उमेदवार ऊभे करणे, पुढील दिशा ठरवणे करीता चर्चा करण्यात येत आहे मराठा नेते ,माजी आमदार, कार्यकर्ते येथे दाखल झाले आहे. जरांगे यांनी सांगितल्या प्रमाणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जे इच्छुक आहे असे कार्यकर्ते आप आपल्या गावातील झालेल्या चर्चेचा अहवाल या ठिकाणी घेऊन आले आहेत.
36 जिल्ह्यातील अहवाल जरांगे यांना मिळाले आहे. या अहवालावर या ठिकाणी चर्चा करण्यात येत आहे, सर्वांना विचारात घेऊन कोणा कोणाला निवडणूकीमध्ये उभे करायचे या बाबत निर्णय घेतला जाणार आहे. दिवसभर चर्चा केल्यानंतर सांयकाळी योग्य ती भूमिका, निर्णय जरांगे पाटील जाहीर करणार आहेत. मला राजकारण करायचे नाही, माझा तो मार्ग नाही समाजाची जी भूमिका असेल त्या पुढे मी जाणार नाही असे जरांगे यांनी सांगितले. अंतरवाली सराटी येथील आजच्या बैठकीत काय निर्णय होतो या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.












