बीड, (रिपोर्टर)ः- गेल्या दोन दिवसापासुन बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात ढगाळ वातावरण असुन रात्री 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारा व पाऊस झाला. या अवकाळी पाऊसामुळे अंब्याच्या पिकाचे बरेच नुकसान झाले तसेच काही ठिकाणी भाजी पाल्याचेही नुकसान झाले आहे.
मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंब्याची लागवड आहे. दरवर्षी अवकाळी पाऊसासह वादळी वार्याने अंबा उत्पादक शेतकर्यांचे नुकसान होत आहे. हाथा तोडाला आलेला घास निसर्ग हिसकावून घेत आहे. 15 दिवस ते 1 महिन्याच्या दरम्यान मराठवाड्यातील अंबा विक्रीसाठी बाजारात येणार आहे. तोच वादळी वार्याचा तडाखा मराठवाड्यातल्या बहुतांश भागाला बसल आहे. रात्री पडलेल्या अवकाळी पाऊसामुळे काही ठिकाणी अंब्याच्या कैर्या गळून पडल्या आहेत. या संबंधित शेतकर्यांचे बरेच नुकसान झाले. तसेच भाजी पाल्याचेही नुकसान झाले आहे. बीड तालुक्यासह इतर तालुक्याच्या ठिकाणी भाजीपाल्याचे चांगले उत्पादन घेतले जात आहे. सुसाट्याच्या वार्याने शेतकर्यांच्या गंजीचेही नुकसान झाले.











