मांजरात फक्त 7 टक्के तर जायकवाडीमध्ये 21 टक्के पाणीसाठा
बीड, (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये यावर्षी भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. सर्वत्र पाण्यासाठी हाल होवू लागले. एकीकडे लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली तर दुसरीकडे जनतेच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचे दिसुन येवू लागले. जिल्ह्यात पाण्याचा साठा अत्यल्प शिल्लक राहिला. बोटावर मोजण्या इतक्या धरणामध्ये काही प्रमाणात पाणी आहे. इतर धरणे कोरडे पडले. विहिरी अटल्या, बोअरचे पाणी संपले. जायकवाडी धरणावर अनेक जिल्हे आणि गावे अवलंबून असुन या धरणात 21 टक्के पाण्याचा साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी या धरणात 50 टक्के पाण्याचा साठा होता. मांजरात तर फक्त 7 टक्के पाणी शिल्लक राहिलेले आहे. आज स्थितीत जिल्ह्यामध्ये 100 पेक्षा जास्त गावात भिषण टंचाई निर्माण झाली. पुढच्या महिन्यात आणखी टंचाई ग्रस्त गावांचे आकडे वाढणार आहेत. प्रशासनाने 101 विहिरींचे अधिगृहण केले आहे. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणाहून नागरीक पाणी आणत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकुणच जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा तिव्र झाल्या आहेत.
राज्यात यंदा पाऊस कमी झाला त्यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली. मराठवाड्यात पाणी टंचाईच्या झळा तिव्र होवू लागल्या पाण्याअभावी अनेक क्षेत्रातील पिकांचे नुकसान होवू लागले. काही ठिकाणी तर फळबागा वाळू लागल्या आहेत. बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यात पाणी टंचाई वाढू लागली. पाऊस कमी झाल्याने मोचकीच धरणे भरली होती. इतर धरणात पाणी साठा शिल्लक राहिलेला नाही. जायकवाडी धरणावर अनेक जिल्हे अवलंबून आहेत. मात्र या धरणात 21 टक्के पाणी साठा शिल्लक राहिला. गेल्यावर्षी हे धरण 50 टक्के भरलेले होते. मांजरा धरणात तर 7 टक्केच पाणी शिल्लक राहिले असुन येत्या काही दिवसात हे धरण मृत साठ्यात जाणार आहे. बीड शहरासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई होवू लागली. काही नागरीक विकत पाणी घेवू लागले. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 101 विहिरींचे अधिगृहन केले, 93 टॅकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू आहे. वाढत्या उष्णतेसोबत टंचाई ग्रस्त गावांचा आकडा वाढू लागला. 100 पेक्षा जास्त गावे तहानलेली आहेत. एकीकडे दुष्काळी परिस्थिती आणि दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन निवडणूकीत नागरीकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसुन येत आहे.











