बीड, (रिपोर्टर)ः- बीड लोकसभा मतदार संघाची निवडणूक पुर्वसूचना आदेश येत्या 18 एप्रिलला जारी होणार असुन त्या पार्श्वभुमीवर आज सहाय्यक निवडणूक अधिकारी, महसुल विभागाचे अधिकारी आणि पोलीस विभागाच्या प्रशिक्षण सुरू झाले असुन महसुल आणि पोलीस विभागाने आप आपले निवडून दिलेले काम मोठ्या जोखमेने पार पाडावे असे आवाहन या प्रशिक्षणात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी केले.
आज निवडणूक विषयक सर्व कक्ष प्रमुख, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व पोलीस अधिकारी यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रशिक्षण सुरू झाले. आचारसंहितेचा या निवडणूकीमध्ये कोठे भंग होंत नाही ना. त्याचे पालन होते का, चेक पोस्टामध्ये प्रत्येक येणारे वाहन तपासूनच जिल्ह्याच्या हद्दीमध्ये पाठवण्यात यावे. निवडणूक कामे, उमेदवार हे आपले पोस्टर अणि बॅनर निवडणूक विभागाच्या तत्वानुसार प्रकाशित केलेले आहेत का. निवडणूक कामात उमेदवार किंवा त्यांच्या पक्षाचे प्रचारक भाषण करतांना कोणाच्या भावना त दुखवत नाहीत ना. ह्याही बाबी नेमूण दिलेल्या अधिकार्यांनी तपासाव्यात यासह इतर सर्व बारीक सारीक बाबींचे प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक अधिकारी यांना देण्यात येत आहे. पोलीस विभागाबाबत त्यांची कर्तव्य याबाबत पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनीही काही सूचना यावेळी केल्या. आजच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक धिरजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक केतना तिडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा आचारसंहिता कक्ष प्रमुख वासुदेव सोळंके, अप्पर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा ग्राम विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीतादेवी पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस उप विभागीय अधिकारी, पोलीस निरिक्षक, सर्व खातेप्रमुख, तहसिलदार आजच्या प्रशिक्षणात सहभागी झालेले आहेत.
—-