मराठी मुलखात भाजपाची सत्ता कुलपात, मराठी दौलतीवर दिल्ली तक्त करते प्रघात, ईडी शिडी हातात बेडी, नशेबाजांच्या सोबती आर्यनची हातकडी नुसती पुरापत, कधी कोरोना वायरस, कधी सत्तेचा हव्यास, भाजपाचा हा फास तीन वर्षाचा नास, तरी जय महाराष्ट्राचा जयघोस! आघाडीतली बिघाडी, काँग्रेसची काडी, राष्ट्रवादीत पाटलांची माडी. सेनेच्या वाघाची इथे झाली घोडी, चंपा-टरबुज्याची जोडी, राणे पिता-पुत्रांची खोटी, मंत्र्यांच्या व्याभिचारावर राजीनाम्याची कागदी घडी, कोण कोणाची चड्डीची ओढतोय नाडी, ऐका हो ऐका…. बीड जिल्ह्याच्या मायबापा, बाहेर वाढतोय, उन्हाचा तडाखा, जिल्ह्यात राजकीय असंतुष्टांचा भडका, देवाच्या जमीनीचा पाडला जातोय मुडदा… गुटख्यामुळे झालं इथं वाघाचा बकरा. थोरल्या घरचा वारस म्डणतो, ‘मी डॉन छोकरा’ झुकेगा नही साला पुष्पाचा नखरा… शिराच्या सागरात जमीनीचा तुकडा, भाऊ बंदकीच्या पोटात आकडा, याला पकडा त्याला पकडाच्या निनादात वाळु, मटका, गुटखा… राशन माफियांच्या फोडणीचा तडका…. विधानसभेत स्वकियांनीच उडवला भडका, तिकडं प्रकाशाची ज्योत लाल दिवा शोधतो, इकडं लाल दिवा हात जोडून जिल्हा बदनाम करू नका म्हणतो….

ऐका हो ऐका.. बीड जिल्ह्याच्या माय बापा… इथं वाचवा हो..ऽ चा आवाज देतायत काका… घसा पडलाय सुखा…म्हणतोय टॉप टू बॉटम पुतण्याचा धोका नगर पालिकेत बसलायला आवन्दा मिळेल का हो मोका … बाबाच्या लेकीचा घसा पार पडलाय सुका… माजलगावात प्रकाशदादा शोधतोय मोका… आष्टीत ’धस’कट उपटा…आजबेचं बाळ रीरी करी, गेवराईत काका-पुतण्याची नव्हे मेव्हुण्यांची धुरवाडी, लोकाहो पुढार्यांना नाही येणार तुमचा पुळका… दवंडीवाला दवंडी देत निघाला होता. त्याची आरोळी ऐकून चहाच्या हॉटेलात बसलेल्या तात्यांनी त्याला बोलावलं. आरं ये… ऐकतोस का? ये दवंडीवाल्या… आरं ये बेण्या… तसा दवंडीवाला रागात जाग्यावर थांबाल. मागं न पाहताच त्यानं दोन तीन शिव्या हासाडल्या अन् मागं परतून तात्याच्या दिशेने तो निघाला. दवंडीवाला रागात होता, कोणत्या थेरड्याने आवाज दिला. त्याला बघतोच म्हणत तो तात्याच्या हॉटेलाकडे निघाला. दवंडीवाल्याचा चेहरा लालीलाल झाला होता. पण पहातू तर काय त्याच्या बापाचा मैतूर निघाला तात्या तरीही दवंडीवाला तात्याला म्हणाला, बेणं कुणाला म्हणताय तात्या. कायबी नावानं हाक मारताय राव. मी धर्म्याचा धाकला लेक हाय नाम्या. आता बोला कशाला बोलवलं. दवंडीवाल्याचा तो रुद्र अवतार पाहून तात्याचा आवाज थोडा मवाळ झाला. नामदेवा लामचं दिसत नाही रं कोणाची दवंडी हाय आणि कशाची आरोळी देतोस लेका. तेव्हा दवंडीवाला म्हणाला अवं तात्या अवंदा दुष्काळ बिष्काळ सगळं इसारल्याती लोक. पाणी हाय पण लाईट नाय, बँकात पैका हाय पण

खिशात दाणा नाय. शेतात माल हाय पण बाजारात भाव नाय. भाव हाय तर कापूस अन सोयाबीन नाय . गावात पुढारी हाय पण त्याच्या दारात देणेकरी हायत. निवडून दिलेले पण फरारी हायत. आरं रं… नाम्या थांब थांब काय म्हणतूस कायबी कळत नाय लेका . तात्या म्हणतो अच्छे दिन हायत लेका. इथं कशाची कमी नाही.रामाचं नाव हाय ,धर्माची अफू हाय ,हाताला कामधंदा नसला म्हणून झालं काय ?बघायला काश्मीरची फाईल अन डोस्क्यात जातीयवादाची लाईन ,अजून काय हवं .. नाम्या म्हणतो, तात्या तुम्हासनी डॉक्टरला दाखवावं लागतयं कायकी. तात्या म्हणतो, कारं काय झालं मी तर धडधाकट हाय. नाम्या म्हणतो, तात्या तुम्ही ’नमो रुग्ण’ झालात. हा रोग दिसत नाही. थेट सरणावर गेल्यावरच कळतयं. यावर तात्या गालात हासले अन् म्हणाले, जावू दे रे आता काय पिकलं पान गळणारच. तेवढ्यात एफएमवर गाणं लागलं. ’वर ढगाला लागली कळं, पाणी थेंब थेंब गळं’ नाम्या हासला अन् तात्याला उद्देशून म्हणााल ’पिकल्या पानाचा देठ की वो फिरवा’ तसा तात्या उसळला अन् ये धरम्याच्या बेण्या निट सांग कसली दवंडी. नाम्या म्हणाला तात्या आता झेडपीचं इलेक्शन न्हवं का ! मंग रं ,त्याच काय .धर्म्या म्हणाला जाऊद्या तुम्हाला काय तुम्ही मतदान होऊस्तर रहातात कि नाही ,नाही म्हटलं कोर्ट तिकडं ओबीसीला राजकीय आरक्षण नाही म्हणताय आणि सरकार विरोधक आरक्षणाशिवाय निवडणुका नग म्हणताय .त्या मूळ इलेक्शन कधी होईल सांगता येत नाही . म्हातार जरा जास्तच चवताळलं तस धर्म्या सांगू लागला , अहो तात्या आवन्दा धनुशेठ देतायत धुरवाडीची पार्टी ,घरची अन दारचा चवताळली नव्हे का कार्टी , वैद्यनाथाच्या साक्षीने होणार बघा पार्टी . तात्या म्हणतो बार मग .धर्म्या म्हणतो
. सगळेच येणार हायत. चपटी बोटी, हातभट्टी, देशी-विदेशी, विलायती, थंडाई, घोटा सरवाची सरभसाई आहे. खायला प्यायला मनसोक्त हाय अन् जास्त झालीच तर उतारा बी हाय. असं म्हणत दवंडीवाला निघून गेला. तात्या आपल्या जवानीतले दिवसं आठवू लागले. खिशातली बिडी काढली, शिलगावली झुरका मारला अन् भोसडीच्या म्हणत तात्या निघून गेले. तसा मी लांबून या दोघांचं संभाषण रजनीगंधा चोळत ऐकत होतो. म्हटलं चला उद्या काही तरी भन्नाट बातमी भेटणार असं म्हणत घरी गेलो.आज जरा भल्या सकाळीच उठलो. अंघोळ केली, होळी पेटवली, तिच्यासमोर दोन दोन हातांनी बोंब ठोकली. पुरणपोळी खाल्ली अन् निघालो पार्टीचं ठिकाण पहायला. आण्णाभाऊ साठे चौकात जसाच मी आलो तसं समोर पोलिसांच्या गाड्या फिरतांनी दिसल्या. तेवड्यात कानावर आचरट विचरट आवाजही धडकू लागले. होळीसाठी लाकडं पळवणारे कारटे बोंब ठोकत होते. त्यांनी मला पाहितलं अन् बोंबलायला लागले- ’होळी रं होळी पुरणाची पोळी, पोलीसवाल्याच्या गाडीत बंदूकीची गोळी’ बरं झालं गाडीत हा शब्द नाकातून बोलले असते तर दुसरंच ऐकायला आलं असतं. त्यातला एक पुढं म्हणाला ’पुरणाची पोळी, गुळाचं गुळवणी गेवराईत लक्षिमनाला शक्ती लावील का कोणी ?लगेच दुसरा बोंबला .

शिवछत्र त्यातले आम्ही राजे, का कुणास ठावूक आमचेच वाजतायत बाजे हे ऐकून मी म्हटलं परळीला गेलेलं बरं. पुढं निघालो तेवढ्यात संदीपसेनेची बोंब कानावर आली. काका वाचवा होऽ चा जमाना बाद झाला. हरलेल्या काकांच्या गड्याने गोळीबार केला . मी म्हटलं अरे बाप रे हे कारटे तर आग लावायला बसलेत मग शेपटी यांची असो अथवा इकडून तिकडं उड्या मारणार्या माकडांची आग तर लागणारच ना! म्हणून म्हटलं चला पुढं अन् आलो एसटी स्टॅण्डवर बसमध्ये बसलो गाडी परळीच्या दिशेने सुसाट निघाली पण वाटेत कारटे बोंब ठोकतच होते. फेकूच्या अच्छे दिनवर ’नमो रुग्ण’ फिदा, देवेंद्रच्या गाजरावर हासतायत खदा खदा ही बोंब होते न होते तोच ,आम्हीही गुंडे म्हणणार्या लेडी डॉन ,माफियांची बोंब मारते ,निवडणुकीतल्या पराभवाने अजूनही डोके सरकते ,. गाडी तशी बीडाच्या बाहेर निघाली. बार्शी नाक्यावर काही कारटे म्हणत होते होळी रं होळी पुरणाची पोळी, राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात आमच्या घरी होतेय चोरी तर कोणी ’बोंबला रे बोंबला, एसपीना खाली लोंबवा’ म्हणत बोंब ठोकत होते. तर कुणी पुढारी तसे चांगले, लोकांनी वेशीला टांगले, मतांसाठी घेती पैसा अन् निवडून आल्यावर खायला मागती डोसा अशा एक न् अनेक आचरट विचरट घोषणा ऐकून माझे कान किट्ट झाले होते. कवा एकदाचं परळीत जातोय असं झालं होतं. जसाच मी परळीच्या स्थानकात उतरलो आधी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाला गेलो .माथा टेकला अन म्हणालो नाथा कामूनरे परळीत इतका सन्नाटा .

प्रभू म्हणाले कळालावायाला आलास बेटा ,कशाला घालतोस माझ्या कड़े खेटा . मी म्हटलं मला साक्षात्कार झाला कि काय . असं म्हणत मंदिराच्या बाहेर पडलो तेव्हा मला समजलं पार्टी चे स्थान बंद पडलेली सूतगिरणी आहे . मी बापडा तिथं आलो -समोरचे दृश्य पाहितले अन् तोंडातून अब्बा बब्बा ..ऽ काय तो थाट.. पार्टीसाठी काय तो शामीना सजविला होता. शामीन्यामधल्या टेबलावर चपटी बोटी हातभट्टी, देशी-विदेशी, थंडाई अन् घोटा दिसून येत होता. दिवस मावळतीला गेला मी माझी जागा हेरून ठेवली. उद्या धुरवड हाय म्हणून आज मंदिरात मुक्काम ठोकला. सकाळी लवकर उठलो. फुकटाचा प्रसाद नाश्टा म्हणून खालला अन् गेलो पार्टीच्या शामीयानाकडे-पाहतो तर काय पार्टीची जोरदार तयारी सुरू होती. नौकर चाकर राब राबत होते. धनुभाऊंचे हौसे गौसे अन् चमचे पळापळ करत होते.तिथं वाल्मिकीच रामायण नव्हतं ,सपनाचा ठुमका होता

पिला दे साक़ी मिला के हमको
शराब आधी गुलाब आधा
मिलेगा रोज़-ए-हशर तुझे भी
अज़ाब आधा सबाब आधा
मारा ठुमका बदल गई चाल मितवा
देखो-देखो रे हमरा कमाल मितवा
मारा ठुमका बदल गई
हे बोल कानावर आले म्हटलं आपल्याला उशीर झाला कि काय .पण तस काही नव्हतं आजून निमंत्रित आले न्हवते . सपनाचे चावट चोते तिथं जास्त होते . तेवढ्यात ये गाडी भरधाव आली .गाडीतून रांगडा गाडी उतरला तसा आदेश देऊ लागला . म्हटलं हे धनुशेट लेखन करणारे कलयुगीं वाल्मिक आहेत ते आले म्हणजे निमंत्रित येतायेत हे लक्षात आलं. तस दीड दिसात अन कोल्ह उसात हा शब्द कानी पडला थोडं बाजूला सरकून पाहिलं तर शिरावर केस नसलेलं बुटक्या बांध्याचा पण कामाचं लेकरू आलं . काय राव दौण्डच्या लेकराला ओळखत नाहीत का राव अहो तेच ते विधान भवनात खाली मुंडक वर पाय केलेलं तेवड्यात आणखी एक रुबाबात गाडी

शामीयानाकडे येत होती.जो तो वाकून नमस्कार घालत होता, म्हटलं नक्कीच प्रकाशदादा असणार. दादा गाडीतून उतरले, पाहणी केली अन् अवजड वाहनालगत आत जावून बसले. कालच्या अधिवेशनात सत्य मांडतोय म्हणत लाल दिव्या कडे पहाणारा गडी तसा भारदस्तच ना तेवढ्यात गेवराईचे ताडासारखे मासांपेक्षा हाडाचे राष्ट्रवादी माजी आमदार आले. कोण म्हणताय म्हणून काय विचारता राव अहो अमरसिंह आले तसे ते दादांच्या काफील्यात जावून बसले. दोघांची चर्चा सुरू झाली. तेवढ्यात तसे तिथं आष्टीचं बाळ रांगत रांगत पोहचलं .दोघांना वाटलं आपल्या पक्तीचा माणूस आला म्हणून तेवढ्यात आपबिती सांगण्यासाठी, ’धस’मुसळले ही तेथे आले. पाठोपाठ नाकी डोळी छान ,रंग गोरा गोरा पान , अन चिकना चिकना हे गाणं बाहेर लागलं म्हटलं पुतण्याची जमात आली वाटत तस म्ह्णूस्थर संदीप तेथे आले तेवढ्यात पंडीतमुक्तीचा नारा कानावर पडला. म्हटलं लक्ष्मणशक्तीला साहेबांच्या परळीत छप्पन इंचाची छाती घेऊन आली कि काय ?लक्षिमन अण्णांच्या येण्याने कुरापत कारांच्या गप्पा बंद झाल्या लागलीच

मराठ्यांची मोठ बांधता बांधता देव इंद्राचे प्रवक्ते मेटे येऊन धडकले , थोरल्या घरचे थोरले जयदत्त आण्णा कवणीक येऊन बसले होते . बाजूला काही तरी चमकत होत म्हटलं दिल्लीतली चकाकी आली वाटत . आणि तेही खरंच रजनीताई आल्या होत्या . बाहेर गर्दी वाढल्याचे पाहून बाहेर येतोतर काय ताई साहेब छोट्या ताईंना आणि नमिताना घेऊन आल्या होत्या तेवढ्यात सायरनचा आवाज आला म्हटले आयोजक डहाणू भाऊ आले तस
. सर्वांचा राम राम शाम शाम झाला. आयोजकांनी सर्वांचे स्वागत केले पण यात आपलं कोण अन परकं कोण हे भाऊंना उमजून येत न्हव्हत मनाची घालमेल सुरु होती ताई साहेबाना गालात खळी फुटत होती . धनु भाऊ कस्मे वादे प्यार वफा सब बाते हे बातो का क्या ,कोई किसी का नाही याहा पे सब नाते है नाटो का क्या हे गाणं गुणगुणत आत जात होते . इकडे सुर्य पार डोक्यावर आला होता. सर्व आमंत्रित शामियानात गेले. कोणी गिलासं भरून घेतले. तर कुणी हातात तांबे घेतले. तर कोणी बाटल्या घेवून चिअर्स केलं. रंगांची उधळणं झाली. पिचकार्या उडाल्या. कोण कोणाला काय लावतोय हे पाहत असतांना काहींनी हातात बुक्काही घेतला . तर जेष्ठातले काही इशाराबाजी करताना दिसून आले. देशी, विदेशी, चपटी, बोटी, रम थंडाई हातभट्टी अन् घोटा जसाच घशाच्या खाली उतरला तशी सर्वांनाच आठवण झाली ती गाण्याच्या भेंड्यांची पण आधी कोण म्हणणार या बाबत एकमत होत असतांनाच केजच्या रजनीताई गुणगुणतांना दिसून आल्या. त्या उठल्या अन् म्हणू लागल्या,
केजच्या मळ्यावर कोण गं उभी
राखण करते मी पाटलीन
गल्लीत नाही भेटली पिन
बघा मी खासदारीन
इश्यऽ मला नाही येत बाई याच्यापुढं
असं म्हणत त्या खाली बसल्या. आता प्रितमताई उठल्या अन् ताईकडं पाहून म्हणू लागल्या.
कोई जब तुम्हाला हृदय तोड दे
तडपता हुआ जब कोई छोड दे
तब तूम मेरे पास आणा प्रिये
मेरा सर झुका है झूकाही रहेगा
असा दर्दभरा नगमा पेश करून प्रितमताईंनी पंकजाताईंसमोर आपली वस्तूस्थिती मांडली. तशी दोन्ही बहिणींच्या डोळ्यांचे काट भरून आले. पंकजाताई भावूक झाल्या. हलकी पण कौतूकाची स्माईल देत त्या प्रितमताईकडे पाहतांना दिसून आल्या. वातावरण शांत झालं होतं. तेवड्यात पंकजाताईंनी गाणं म्हणायचा निर्णय घेतला अन् त्यांनी सूर आवळला-
बाबांचा आम्ही सरदार आम्हाला

काय कुणाची भिती
परळीत काम करूनही
जिंकली द्वाडाची नाती
आता वाढतेय भावाची ख्याती
होतेय माझ्या आरोपाची माती
ताईसाहेबांचे धगधगते गीत कानावर पडल्यावर अनेकांचे कान टवकारले. तसे विनायक मेटे उभा राहिले. अन् वरच्या पट्टीत त्यांनी सुर लावला.
शिट्टी वाजली गाडी सूटली
झेंडा राहिलाय वर
देव इंद्र माझं देव घर
मेटेंच्या नावाचा लई जोर शोर
असं आनंद मिलींद शिंदेंच्या तोर्यात गात मेटेंनी तेंव्हाची आपली शिट्टी पुन्हा वाजवली .तेवढ्यात आमच्या लेकुरवाळ्या ताई उठल्या आणि नमिता म्हणू लागल्या
बा नीज गडेऽ नीज नीज लडिवाळा
पाळणा लवांकुश बाळा
मी वासंती आळविते अंगाई
छकुल्यांनो तुमची ताई, तुमची ताई
हे अंगाई गीत गाऊन त्या खाली बसल्या तेवढ्यात लक्ष्मण पवार उठले, पंडितमुक्तीचे नारे देत सुटले. एवढाच येत म्हणून ते खाली बसले . मग उठले ते आष्टीतले धसमुसळे दुःखांकित असलेल्या अण्णांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या आणि विनम्र पणे खाली बसले , वातावरण तस शांत होऊन गेलं होत . आत्ता कोण गाणं म्हणणार या कडे सर्वांचे लक्ष लागले तोच दौण्ड यांचे संजय उठले आणि म्हणू लागले
मी माझाच करतो
खाली मुंडक वर पाय
धनु भाऊंचा फक्त
माझ्यावरच विश्वास हाय
या गाण्यावर दाद येण्या पेक्षा शामियान्यातले सर्वच एकमेकांकडे पाहात गुप्तगू करू लागले तेवढ्यात आम तो तंबू मे बाम्बू लगाये बैठे म्हणत गेवराईचा ताडा सारखा लांब लचक माणूस उठलामाझी हुशारी
जनता म्हणते भारी
विरोधकांसाठी फुगीरी
पक्षातला मी लय भारी
अमरसिंहांच्या या गाण्यावर उत्तर देण्यासाठी आतुर असलेले लक्षिमण पुन्हा उठण्याच्या तयारीत असताना माईकचा ताबा बाळासाहेब आजबे नि घेतला
मला हो म्हणतात काका
मी शोधात आलोय मोका
काम झालं कि ,कवा कुणास
देईल मी धोका
इशारेबाज गाण्याने सत्ताधारी आणि प्रतिस्पर्ध्याचे कान टवकारले ,तेव्हा गाण्या साठी प्रकाश दादा उभा राहिले . दांडगा गडी डायस जवळ जाताच ताई माई ,भाऊ भैया दादांच्या गण्या कडे कान टवकारून होते दादा नि सूर आवळला
याहू याहू
चाहे कोई मुझे जंगली
कहे केहने दो जी कहते रहे
हम लाल दिवा के तुफानो में
गिरे है हम क्या करे
चाहे कोई मुझे जंगली
कहे केहने दो जी कहते रहे
हम लाल दिवा के तुफानो में
गिरे है हम क्या करे
चाहे कोई मुझे जंगली कहे
याहू याहू


या गाण्या वर ताई साहेबानी टाळ्या वाजवून दाद दिली. काहींनी टाळ्या वाजविण्यासाठी हात पुढे केले, मात्र मस्तकासमोर जोडून वेळ निभावून नेली. या गाण्यानंतर आता गाणं म्हणण्यासाठी कोण उठल याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच थोरल्या घरचे थोरलेपण आदबीने उठले अन् गाणं म्हणण्यापेक्षा सामंजस्याच्या भूमिकेत व्याख्यान देताना दिसले. ते काय, कोणाला कसा, संदेश देतात, याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण कोणाशी आतलं सख्ख्य हे केवळ ज्याला त्यालाच समजलं… आता या व्याख्यानानंतर संदीपभैय्या उठले, डायसवर जावून उभा राहीले… अन् एका शब्दात झुकेगा नही साला… म्हणत, खाली बसले…. आता सर्वांचं लक्ष शेवटच्या गाण्याकडे होतं… आयोजक काय गाणं म्हणतात…. का ते व्याख्या, बिख्यान देतात… याकडे लक्ष असतानाच धनुसेठ डायसवर आले…अन् गाऊ लागले,जब जब दुनिया में अहंकार बढता हैइमोशनल ब्लॅकमेलिंग होती हैतब तब हमारे जैसेकाकाके उगली की सौगंध लेते है और चल पडते है कामयाबी की तरफ और बोलते है हमे चिर दो यारो ये जो खून है वो आपकाही है. धनुभाऊच्या डायलॉगबाजीने सभागृह शामियानामधला शांत झाला. आता गाण्याच्या भेंड्या संपल्या होत्या… आता दिस मावळतीला गेला होता. पोटात चपटी बोटी हातभट्टी देशी विदेशीने कल्लोळ माजविला होता. पोटात आग पडली होती. जो तो भुक भुक करत होता. सर्वांनी भोजनावर ताव मारला. संध्याकाळ झाली. अन् परंपरेनुसार भारनियमनाची वेळ आली, लाईट गेली. अंधारात कुठं काय काय झालं ते मात्र नाही कळालं