संस्थेच्या संचालकांवरही गुन्हे दाखल
बीड (रिपोर्टर):- वडवणी येथील संस्थेची जमीन आधिकारात नसताना परस्पर विक्री करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार एकुण 61 लाख 52 हजार रुपये रक्कमेचा अपहार करुन संगणमताने फसवणुक केल्या प्रकरणी अहमदनगर येथील जिल्हा उपनिंबधक अमोल विठ्ठलराव माने यांच्यासह लेखापरीक्षक डी.बी. गोरे यांच्यासह दोन व्यक्ती व संस्थेच्या संचालक मंडळावर रात्री वडवणी पोलीसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी येथील सहाय्यक निंबधक सहकारी संस्था या कार्यालयातील अधिकारी शिवराज दिलीप नेहकर यांनी याबाबत तक्रार दिली आहे. यामध्ये असे म्हटले आहे कि, लक्ष्मी यंत्रमान औद्योगिक सहकारी संस्था मर्या. वडवणी ता. वडवणी जि.बीड या अवसायनातील संस्थेची जमीन बेकायदेशिरपण विक्री करून यातील अरोपीतांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून अवसायनातील संस्थेची जमीन अधिकारात नसताना परस्पर विक्री करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली व ती सत्या असल्याचे भासवुन सदर कागदपत्रे शासकीय कामकाजानिमित्त वापरली व संस्थेचे शासकीय मुल्यांकन रू 47,62,500/- व खरेदीखतावर दर्शवण्यात आलेली रक्कम रू 13,90,101/- अशा एकुण 61,52,601/- इतक्या रक्कमेचा अपहार करून आपआपसात संगणमताने फसवणुक केली आहे. तर हि फसवणुक दि.3 संप्टेबर 2017 ते दि.28 नोंव्हेबर 2023 या कालवधीमध्ये घडली आहे. या प्रकरणी सहा. निंबधक सहकारी संस्था जिल्हा उपनिंबधक अहमदनगर येथील अमोल विठ्ठलराव माने, लेखापरीक्षक डी. बी. गोरे (परळी येथील असल्याची माहिती), शिवाजी दिलीप नेहरकर (रा.मुळशी जि. पुणे), आशा प्रकाश डिगे (रा.वडवणी) तसेच लक्ष्मी महिला यंत्रमान सहकारी संस्था वडवणीचे संचालक मंडळ यांच्या विरोधात गुरनं. 82/2024 कलम 420, 409, 467, 468, 470, 471, 34 भांदवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणी वडवणी पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरिक्षक अमन सिरसट हे करत आहेत.