जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
बीड (रिपोर्टर) शासकीय धान्य गोदामातील हमाली कामाची कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी शासकीय धान्य गोदाम हमाल पंचायत, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहेत.
थेट वाहतुकी अंतर्गत तालुक्याच्या ठिकाणी त्या तालुक्याच्या गोदामातून धान्य दुकानदारांना धान्य देण्याऐवजी थेट अन्न महामंडळाच्या डेपोतून स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य देण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करावा, शासकीय गोदामातील हमाली कामाची कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी, हमालांच्या आरोग्यास धोकादायक ठरणार्या 16 टायर गाड्यांचे काम थांबविण्यात यावे, दरमहा केलेल्या कामाची मजुरी माथाडी मंडळातून नियमीत मिळावी यासह इतर मागण्णयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजकुमार घायाळ यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.