Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईपहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना मोफत गणवेश; पहिलीपासून मिळणार द्वैभाषिक शिक्षण

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्याना मोफत गणवेश; पहिलीपासून मिळणार द्वैभाषिक शिक्षण


शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची विधिमंडळात घोषणा
मुंबई (रिपोर्टर) राज्यातील विद्यार्थ्यासाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाच्या घोषणा करत पहिलीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून आता राज्यातील पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणार्‍या सर्वच विद्यर्थ्याना मोफत गणवेश दिला जाणार आहे तशी घोषणा शिक्षण मंत्र्यानी करून राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. मात्र, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येणार असल्याचे विधिमंडळात सांगितले.

warsha gaykwad

विधानसभेत शिक्षण विभागाशी संबंधित उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी म्हटले, राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. मात्र, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्या-र्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व मराठी माध्यम शाळांत पहिलीपासून एकात्मिक आणि द्वैभाषिक अभ्यास लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून सर्व मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये एकात्मिक आणि द्विभाषिक पाठ्यपुस्तके सादर करण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी केली आहे. बालभारतीला उच्च दर्जाची पाठ्यपुस्तके आणण्याची सूचना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. या पुस्तकांमध्ये मराठी शब्द आणि वाक्यांसह इंग्रजी मजकूरदेखील असणार आहे. त्यामुळे मुलांचा मूलभूत इंग्रजी शब्दसंग्रह, व्याकरण आणि वाक्यरचना शिकू शकतील.
आता पर्यंत राज्यातील मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश आणि लेखन साहित्य पुरवण्यात येते. आता सरसकट पहिली ते आठवीच्या विद्याथ्यांना ते पुरवण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. कॉंग्रेसचे सदस्य अमरनाथ राजूरकर, राष्ट्रवादीचे विक्रम काळे, संतोश चव्हाण यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थिती होती. त्या उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील अनुसूचित जाती व जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जाती या गटातील इयत्ता पहिली ते चौथोच्या विद्याथ्यांना मोफत गणवेश व लेखन साहित्य पुरवण्याची योजना १९८० मध्ये सुरू झाली.मोफत गणवेश देण्यासाठी प्रति विद्यार्थी ६०० रुपये खर्च येतो. याअंतर्गत ३६ लाख सात हजार २९२ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. उर्वरित वंचित विद्याथ्यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये १२ लाख ६० हजार ७४४ विद्यार्थी लाभधारक होतील. त्यासाठी ७५ कोटी ६४ लाख रुपये अधिकचा खर्च येणार असून हा प्रस्ताव वित्त विभागाला पाठवला असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!