धर्मापुरी रस्त्यावर रात्री घडली घटना
परळी (रिपोर्टर): विद्युत वाहिनीचे सिमेंट पोल घेऊन जाणारा ट्रॅक्टर रात्री पलटी झाला असून यामध्ये दोन कर्मचारी गंभीररित्या जखमी होऊन जागीच ठार झाले तर तिघे जणांना गंभीर मार लागला. ही घटना रात्री धर्मापुरी रस्त्यावर घडली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परळी तालुक्यातील धर्मापुरी येथून पाच मजूर एका ट्रॅक्टरमधून विद्युत वाहिनीसाठी लागणारे सिमेंटचे पोल भोजनक वाडीकडे निगाले होते. धर्मापुरी रस्त्यावर कॉलेज जवळील उतारावर अचानक ट्रॅक्टर पलटी झाला. यामध्ये ट्रॅक्टरमधील सिमेंटचे पोल मजुरांच्या अंगावर पडले. त्यात दबून दोन मजूर जागीच ठार झाले तर तिघा जणांना गंभीर मार लागला. प्रल्हाद वैजिनाथ फड व भाऊसाहेब माणिक केदार (दोघे राहणार भोजनेचीवाडी) अशी दोघांची नावे आहेत. घटनेची माहिती होताच परळी ग्रामण पोलीस ठाण्याचे मनिष पाठक, एपीआय जाधव, नवनाथ हरनावरकर, सुनील अन्नमवार यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. जखमींना अंबाजोगाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.