Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडआजच्या व्यवस्थेने जवानांना किसानांच्या विरोधात उभं केलं मै भी किसान हुँ म्हणत...

आजच्या व्यवस्थेने जवानांना किसानांच्या विरोधात उभं केलं मै भी किसान हुँ म्हणत धनंजय मुंडेंचा शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा


बीड (रिपोर्टर)- जय जवान जय किसानचा नारा लावणारी आपल्या देशाच्या व्यवस्थेने आज जवानांना किसानच्या विरोधात उभे केले आहे. अन्नदात्याच्या हक्काच्या लढाईत सामील व्हा, एक जुटीने लढू, असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ‘मै भी किसान हुँ, किसान का बेटा हुँ, इस किसान आंदोलन का समर्थन करता हुँ’, असं ट्विट करत भारत बंदला पाठिंबा देत सामील होण्याचे आवाहन केले आहे.


केंद्र सरकारने केलेल्या शेती कायद्याला देशभरातून विरोध होत असून हरियाणा, पंजाबमधील शेतकर्‍यांनी गेल्या दहा-बारा दिवसांपासून दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलकांचा संघर्ष आज देशभरात जाऊन पोहचला असून सर्वस्तरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. उद्या ८ डिसेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून भारत बंदला पाठिंबा दिला आहे.

त्याचबरोबर या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘जय जवान जय किसान’चा नारा लावणारी आपल्या देशाच्या व्यवस्थेेने आज देशाच्या जवानांना किसानांच्या विरोधात उभं केलं असल्याचे सांगत अन्नदात्यांच्या या लढाईत आओ मिलकर हात बटाएँ असं म्हणत धनंजय मुंडेंनी ‘मै भी किसान हुँ, किसान का बेटा हुँ, किसान आंदोलन का समर्थन करता हुँ’ असं म्हटलं आहे.

Most Popular

error: Content is protected !!