माजलगाव (रिपोर्टर): बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीकडून असणार्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी बुधवार दि.24 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.येथील आयोजित महासभेत अनेक तगड्या नेत्यांची उपस्थिती होती.असे असले तरी या व्यासपीठावर मुंडे फॅमिलीच्या जवळचे समजले जाणारे निवडणूक प्रचारातील’फायर ब्रँड पर्सनॅलिटी’ बहुजन नेते बाबुराव पोटभरे यांची उणीव उमेदवारासह अनेकांना सतावून गेली.त्यामुळे अचानक पोटभरेंच्या भेटीसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आ.सोळंकेंसह मध्यरात्री थेठ’त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.दरम्यान पोटभरे काय भूमिका घेतात याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.
महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.त्यानंतर आयोजित सभेत लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.तर जिल्हाभरातील सर्वच बडे राजकीय प्रस्थ व्यासपीठावर उपस्थित होते.परंतु या व्यासपीठावर उमेदवारासह अनेक राजकीय पुढार्यांना ऊनिव जाणवली ती निवडणूक प्रचारातील ’फायर ब्रँड’असणार्या बाबुराव पोटभरे यांची!कारण आयोजित कार्यक्रमात त्यांचे नाव होते.स्व. गोपीनाथ मुंडे,पंकजा मुंडे,धनंजय मुंडे,यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध राहिले आहेत.जिल्ह्यातील दलित, मुस्लिम,मराठा,बहुजन मतदारांवर त्यांची पकड आहे.याची जाणीव जिल्ह्यातील सर्वच राजकीय पुढार्यांना.त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच,पंकजा मुंडे,बजरंग सोनवणे,ज्योतीताई मेटे यांनी त्यांच्या भेटी घेतल्या.परंतु पोटभरेंनी अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नाही.पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर घेतलेल्या सभेतही ते निमंत्रित असून अनुपस्थित होते. त्यांची ही उणीव येथील उमेदवारासह अनेकांना चटका लावून गेली.पोटभरे यांची सोबत महायुतीला असणे किती आवश्यक आहे.याची जाण असल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आ.प्रकाश सोळंके यांना सोबत घेऊन अचानक मध्यरात्री पोटभरे यांचे निवासस्थान गाठले.भेटीतील तीन तासात झालेली चर्चा गुलदस्तात आहे.दरम्यान जातीय समीकरणाच्या वजाबाकीत बीड लोकसभेची निवडणूक टोक गाठत आहे.अशा स्थितीत बाबुराव पोटभरे यांच्या भूमीकडे जिल्ह्याभरात सर्वांचे लक्ष लागून आहे.