Wednesday, May 18, 2022
No menu items!
Homeबीडसामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना सौम्य ह्रदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना सौम्य ह्रदयविकाराचा झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई –

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्य जाणवू लागल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धनंजय मुंडे यांना संध्याकाळच्या सुमारास छातीत वेदना जाणवू लागल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या कुटुंबीयांशी देखील त्यांनी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!