बीड (रिपोर्टर) खंडेश्वरी परिसरात दिवसाढवळ्या एका तरूणाचा दगडाने ठेचून निर्घुणपणे खून करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. घटनास्थळी संबंधित ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून मारेकरी तरुण घटनास्थळीच उभा होता
हा घटनास्थळावरचा आरोपी
पोलीस ठाण्यात आणून बसवल्या नंतर
खंडेश्वरी रोडच्या परिसरामध्ये आज दुपारी एका तरूणाला काही तरूणांनी बेदमपणे मारहाण करून त्याचा निर्घुण खून केला. सदरील हा खून दगडाने ठेचून केल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले होते. मयत तरूणाचे नाव निष्पन्न झालेले नव्हते. सदरील हा खून नशा करण्यावरून झाला असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तरूणाचा खून करणारा एका जणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदरील हा मारेकरी घटनास्थळावरच उभा होता असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेतील मयताचे नाव उत्तरेश्वर उर्फ पश्या हौसराव भोसले रा नूर कॉलनी गांधीनगर बीड असे आहे तर मारेकरी असलेल्या तरुणाचे नाव दीपक संतोष भोरे वय १९ रा . खडकपुरा पेठ बीड असे आहे .पश्याची हत्या केल्या नंतर तो घटनास्थळी होता . पेठबीड पोलिसांनी त्याला तेथूनच ताब्यात घेतले