बीड (रिपोर्टर): परभणी येथील शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा संशयास्सपद मृत्यू असून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी रस्त्यावर उतरले. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संविधान बचाओ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी धडकला. या मोर्चात हजारो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते.
परभणी येथे जाणीवपुर्वक संविधान प्रतिमेची केलेली विटंबना यासह शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला संशयास्पद मृत्यू तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले गैरवक्तव्ये केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्या या सर्व घटनांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज बीह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर संविधान बचाओ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघाला होता. मोर्चामध्ये हजारो अनुयायांची उपस्थिती होती.










