खोटे कागदपत्र दाखल करून जन्म प्रमाणपत्र काढले
गेवराई पोलिसात सात जणांविरोधात गुन्हा दाखल
गेवराई, (रिपोर्टर)ः- जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी खोटे कागदपत्र व शपथपत्र गेवराई तहसिल कार्यालयात दाखल करण्यात आले होते. सदरील हा प्रकार तहसिल विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणी तहसिल विभागाने खोटी कागदपत्रे दाखल करणार्या सात जणांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान भाजपाचे माजी खा.किरीट सोमय्या बनावट जन्मप्रमाणपत्र संदर्भात गेवराई पोलिस ठाण्यात आलेले आहेत.

काशीनाथ देवराव हातागळे (रा.आनंदवाडी, तलवाडा), सुनिल माणिक राठोड (रा.काठोडा ता.गेवराई), संजय भिमराव राठोड (रा.कुंभेजळगाव ता.गेवराई), शेख शहाना तब्बसूम शेख इब्राहीम (रा.गेवराई), करण भिमराव कोरडे (रा.गेवराई),संजय लहू राठोड (रा.गेवराई), अर्चना रामभाऊ पवार (रा.गेवराई) या सात जणांविरोधात क्रांती अंकुश गिरी (महसूल सहाय्यक नेमणूक कर्मचारी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील या सात जणांनी बनावट कागदपत्र दाखल करून जन्मप्रमाणपत्र काढल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान भाजपाचे माजी खा.किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म प्रमाणपत्रा संदर्भात जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यात तक्रार देखिल केली होती. आज सोमय्या हे गेवराई पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून आहेत.









