जमिन वाटून देत नसल्याने घर पेटवले
बीड, (रिपोर्टर)ः- माझ्या हिस्स्याची जमिन वाटून का देत नाही, असा प्रश्न पित्याला उपस्थित करत कुडाच्या घराला आग लावली. या आगीमध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य जळून खाक झाले. ही घटना गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग येथे घडली.
सुरेश सखाराम वाघमोडे (रा.सिरसमार्ग ता.गेवराई) याने दारू पिऊन घरी येत आपला पिता सखाराम वाघमोडे यांना शिवीगाळ करून माझ्या हिस्स्याला येणारी शेतजमिन माझ्या नावावर का करुन देत नाही? असा प्रश्न उपस्थित करत कुडाच्या घराला आग लावली. या आगीत बाजरी, हरभरे, गहू, भुईमूग यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या प्रकरणी सखाराम वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा सुरेश वाघमोडे याच्या विरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






