बीड, (रिपोर्टर)ः-जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे यामागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन डाव्या पक्षाचे कॉ. नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

विधेयकाचा गैर वापर करून स्वतंत्र पत्रकार व माध्यम संस्था यांना लक्ष केले जावू शकते. विधेयकामुळे मान्यता प्राप्त राजकीय पक्ष व संघटना, सामाजिक संघटना आणि निम सरकारी संघटना यांच्या संविधानीक आंदोलनावर निर्बध येवून जनतेच्या न्याय मागण्यांना शासनासमोर मांडण्याच्या प्रक्रियेवर अन्याय कारक बंधने व मर्यादा येवू शकतात. त्यामुळे हे विधेयक रद्द करण्याची मागणी डाव्या पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी कॉ.नामदेव चव्हाण, डी.जी.तांदळे, भाऊराव प्रभाळे, अजय बुरांडे, अशोक थोरात, कॉ.चव्हाण, मोहन गुंड, कॉ.बाबा सर, सुहास जायभाय, बळीराम हुंबे, कॉ.खेत्री कुंडलिक, मुरलीधर नागरगोजे, दत्ता डाके, मनिषा करपे, कुसूम उजगरे यांच्यासह आदींची उपस्थिती हेाती.






