शेतकर्याचे लाखो रूपयांचे नुकसान
गेवराई, (रिपोर्टर) ः सिरसदेवी येथील एका शेतकर्याच्या रेशीम शेडला आग लागल्याने या आगीमध्ये दिड लाख आळ्या व अंतिम टप्प्यात आलेले रेशीम कोष जळून खाक झाले. सदरील घटनेत शेतकर्याचे लाखो रूपयाचे नुकसान झाले. ही घटना आज सकाळी घडली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

रमेश लक्ष्मण शिंदे (रा.सिरसदेवी) यांची पांडूळ्याची वाडी शिवारात गट नं. 145 मध्ये शेती आहे. शेतात त्यांनी रेशीम कोष चे शेड उभारले. आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान शॉर्ट सर्किटने त्यांच्या शेडला आग लागली. या आगीत दीड लाख आळ्या व अंतिम टप्प्यात आलेला रेशीम कोष जळून खाक झाला. यात शिंदे यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. शेड जळून महावितरणची विद्युत तार गेलेली असून पार्किंग होऊन शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली आहे.








