आज तीन तोळे सोने पळवले

बीड, (रिपोर्टर)ः-बसमध्ये चढत असतांना एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन चोरून नेल्याची घटना 31 एप्रिल रोजी घडत नाही तोच आज एका प्रवाशाचे तीन तोळे सोने पळवले. दोन दिवसापुर्वी एका प्रवाशांचे 40 हजार रूपये चोरले होते. चार दिवसात तीन चोरीच्या घटना बसस्थानकामध्ये घडल्या असून तेथील पोलिस नेमकं करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नंदिनी अंबादास दहिफळे (रा.खडकवाडी ता.पाटोदा) ही महिला बीड ते जामखेड जाणार्या बसमध्ये चढत असतांना तिच्या गळ्यातील सोन्याचे गंठन अज्ञात चोरट्याने चोरून नेले. आपल्या गळ्यातील गंठन चोरीला गेल्याचे महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर तीने ही बाब आपल्या पित्यास सांगितली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
सदरील हे गंठन 1 लाख 90 हजार किंमतीचे होते. आज पुन्हा एका प्रवाशाचे तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने पळवले. दोन दिवसापुर्वी एका प्रवाशाचे 40 हजार रूपये लंपास केले होते. दरम्यान दररोज बसस्थानकात चोर्या होत असतांना पोलीस नमके करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.





