बीड (रिपोर्टर): जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकधार्जिण्या अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबार भ्याड हल्ल्यामुळे असंख्य निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला तसेच या घटनेमुळे देशभरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पाकधार्जिण्या अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज दुपारी 12.00 वाजताच्या दरम्यान धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
दरम्यान संतप्त शिवसैनिकांनी अतिरेक्यांच्या फोटोला जोडे मारत मुडदाबाद मुडदाबाद पाकिस्तान मुडदाबाद अशा घोषणा दिल्या. भारत देश यशाची उंची गाठत असताना वारंवार पाकधार्जिन अतिरेकी दहशत पसरवण्यासाठी असे भ्याड हल्ले करतात. देशातील निष्पाप लोकांचे बळी घेतात. मात्र देशाची सुरक्षा यंत्रणा त्यांना शोधण्यासाठी कामाला लागलेली आहे. एक शिवसैनिक म्हणून माझी इच्छा आहे जिथे पाकधर्जिन अतिरेकी दिसतील तिथेच त्यांना गोळ्या घालव्यात ज्याने करून इथून पुढे कुणी आपल्या देशकडे डोळा वर करून पाहायची हिंम्मत करणार नाही. पाकधर्जिन अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा बीड जिल्हा शिवसेनेकडून तीव्र जाहीर निषेश व्यक्त करण्यासाठी आम्ही शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून हे निषेश आंदोलन केले आहे.
अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांनी प्रसार माध्यमांना दिली. याप्रसंगी शिवसेना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांच्या समावेत बीड जिल्हा शिवसेना, युवासेना, शेतकरी सेना, ओबीसी सेना, अनुसूचित जाती-जमाती सेना, एसटी कामगारसेना तसेच सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.





