बीड (रिपोर्टर): हंगाम 2024-25 मधील सोयाबीन खरेदी प्रक्रिये दरम्यान अनियमितता केल्या प्रकरणी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने राज्यस्तरीय नोडल संस्थेअंतर्गत जिल्ह्यातल्या सहा खरेदी केंद्रांना काळ्या यदाीत टाकण्यात आले आहे.
जिल्ह्यातील घाटनांदूरची आदित्य कृषी निविष्टा सहकारी संस्था, आनंदवाडी परळी येथील जयहनुमान कृषी संस्था, बर्दापूर येथील किसान कृषी संस्था टोकवाडी येथील शेतकरी कापूस प्रक्रिया संस्था, तळेगाव येथील वक्रतुंड कृषी संस्था, जोगाईवाडी येथील वसुंधरा फळे भाजीपाला व फुले सहकारी संस्था काळ्या यादीत टाकण्यात आल्या आहेत.





