बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यातील विविध नद्यांमधून अवैधरित्या वाळुचा उपसा होत असतानाही याकडे प्रशासन डोळेझाक करत आहे. वाळू उपसा प्रकरणी दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू आहे. यामध्ये गणेश ढवळेंसह आदींची उपस्थिती आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाभरातील छोट्या-मोठ्या नद्यातून वाळुचा सर्रास उपसा होतोय, कुठलेही टेंडर नसताना वाळू माफिया वाळू उपसा करून शासनाला लाखो रुपयांना चुना लावण्याचा प्रयत्न करत असतानाही महसूल आणि पोलिस प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. दोषींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू आहे. या वेळी गणेश ढवळे, शेख यूनुस, बाळू माळशिखरे, आप्पा माळशिखरे, सविता माळशिखरे, वंदना माळशिखरे, शारदा माळशिखरे यांच्यासह आदींची उपस्थिती आहे. दरम्यान आष्टी तालुक्यातील टाकळसिंग शिवारात वाळुचा अनाधिकृत उपसा सुरू होता. या प्रकरणी संबंधित अधिकार्यांना वाळू माफियांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला. यासह अन्य तालुक्यातही वाळू माफियांची दादागिरी दिसून आली.