
निवडीचा बीडमध्ये जल्लोषात आनंदोत्सव साजरा
समता परिषदेसह ओबीसी समाजातील विविध
संघटनांनी एकत्रित येत पेढे वाटून फटाके फोडून केला जल्लोष
बीड (रिपोर्टर): ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल बीड शहरांमध्ये या निवडीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. समता परिषदेसह ओबीसी समाजातील विविध संघटनांनी एकत्रित येत फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांना भाजपा महायुतीच्या सरकारने उशिरा का होईना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतल्याने संपूर्ण देशभरात समता परिषदेसह ओबीसी समाजामध्ये आनंद निर्माण झाला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे राज्यातील ओबीसी समाजाने आभार व्यक्त केले असून बीडमध्ये समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष समीरभाऊ भुजबळ, आ. पंकजभाऊ भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समता परिषदेचे राज्य सरचिटणीस ड. सुभाष राऊत यांच्या नेतृत्वाखाली मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. बीड शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास समता परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ओबीसी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी ओबीसी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेवराव दुधाळ, परीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप, सोनार समाजाचे नेते ड. संदीप बेदरे, माळी महासंघाचे ज्येष्ठ नेते प्रा. लक्ष्मणराव गुंजाळ, भाजपाच्या नेत्या संजीवनीताई राऊत, माजलगावचे समता परिषदेचे नेते संतोष रासवे, मोहनराव गोरे, संतराम पानखडे, दिनकर जमदाडे, बाबासाहेब दुधाळ, विठ्ठल भराटे, अशोक भानुसे, बीड शहर बचाव मंचचे अध्यक्ष नितीन जायभाये, नारायणराव शिंदे, समता परिषदेचे युवा नेते संदीप दुधाळ, अजय राऊत, सार्वजनिक जयंती महोत्सवाचे माजी अध्यक्ष तुषार दोडके, समीर राऊत, महादेव आढाव, मच्छिंद्र आढाव, दत्ता लव्हाळे, जगन खेत्रे, अशोक रासवे, महेश व्यवहारे, स्वप्निल शिंदे, महेश चौधरी, गोटू साखरे, अमोल राऊत, ह. भ. प. खरमाटे महाराज, रवी काळे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.






