
पाईपलाईनसाठी रस्ते खोदून ठेवले, खड्डयात पडून लोकांचे हातपाय तुटू लागले
नेकनूर, (रिपोर्टर)ः-कुंभारी ते नेकनूर जलजीवन योजनेचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. गुत्तेदारांनी काही ठिकाणी पाईपलाईनसाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. या रस्त्याची पुर्णतः वाट लागली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या पावसामुळे रस्त्यावर नुसता चिखल झाला आहे. खड्डयात येणारे जाणारे नागरीक पडू लागल्याने त्याचे हात पाय तुटू लागले. एक वयोवृध्द पडल्याने त्यांना अक्षरशः उचलून न्यावे लागले.
कुंभारी ते नेकनूर येथील पाणी पुरवठा योजनेसाठी 19 कोटी रूपयाची योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. योजना अजुन पूर्ण झाली नाही. गुत्तेदारांनी पाईपलाईनसाठी जागो जागी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे याचा त्रास नागरीकांना होवू लागला. पाईपलाईने काम पूर्ण करण्याच्या सूचना ग्रा.पं. ने वेळोवेळी देवूनही गुत्तेदार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसामुळे नेकनूर येथील रस्त्याची पुर्णतः वाट लागली. खड्डयात येणारे जाणारे नागरीक पडू लागले. त्यामुळे त्यांचे हातपाय तुटू लागले. एक वयोवृध्द पडल्याने त्यांना अक्षरशः चौघा जणांने उचलून नेले. कामात हाइगाइ व निष्काळजीपणा करणार्या गुत्तेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे व जे रस्ते खोदून ठेवले ते रस्ते पुन्हा पुर्ववत दुरूस्त करण्याची मागणी केली जात आहे.








