
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मा.आ.भीमराव धोंडे च्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा रॅली, ‘ऑपरेशन सिंदूर”च्या यशाबद्दल काढली तिरंगा रॅली
आष्टी (रिपोर्टर):- भारतीय सैनिकांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदुर राबवत शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानवर एअरस्ट्राइक करत प्रत्युत्तर देऊन अनेक दहशतवादी अड्डे उध्वस्त करून ऑपरेशन सिंदुर यशस्वी केल्याबद्दल आष्टी विधानसभा मतदारसंघाचे मा.आ.भिमरावजी धोंडे यांच्या वतीने भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ आष्टीत तिरंगा रॅली काढून सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.मा.आ.धोंडे यांच्या संपर्क कार्यालयापासून सकाळी 11 वाजता राष्ट्रगिताने रॅलीला सुरुवात झाली व शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा रॅली काढण्यात आली.आष्टी शहरातून तब्बल 1 ते 2 किलोमीटर तिरंगा ध्वज हातात घेऊन निघालेल्या रॅली ने आष्टी शहर तिरंगामय झाले होते.भारत माता की जय या जयघोषाने आष्टी शहर दणाणले होते.दभक्तीपर गाणे व तिरंगामय वातावरणाने शहरात देशभक्ती ला उधाण आला होता.
आष्टी शहरातील मा.आ.भिमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयापासून सुरू झालेली तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनि चौक,कमान वेस,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेने समारोप करण्यात आला यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, हम सब भारतीय है, भारतीय सैन्यदलाचा विजय असो, वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा देऊन आष्टी मतदारसंघातील सर्व हिंदू मुस्लिम देशप्रेमी नागरिक सैदव सैनिकांसोबत आहोत, हे दाखवून दिले. तिरंगा युवकांच्या हातात दिसून आला.
‘भारतीय सैन्य जिंदाबाद’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.प्रत्येकाच्या हातातील तिरंगे ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.या रॅली मध्ये युवा नेते अजय दादा धोंडे,अभयराजे धोंडे, माजी सभापती नियामत बेग ,ड.रत्नदीप निकाळजे, आजिनाथ गवळी,पांडुरंग नागरगोजे,सईद भाई चाऊस,युवा नेते आस्ताक भाई शेख,सरपंच सावता ससाणे,सतिश झगडे,दादासाहेब जगताप, ज्ञानेश्वर वाघ, अभय गर्जे, आरपीआयचे आष्टी तालुका अध्यक्ष अशोक साळवे,,संभाजी जगताप,अरुण सायकड,आण्णासाहेब लांबडे,बबनराव औटे,बाबा साहेब ससाणे,गौतम ससाणे,बबनराव सांगळे,हादी शेख,सदाभाऊ दिंडे,शेख आज्जुभाई,ड. विधाते, पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









