
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाया करत आहेत. आतापर्यंत अनेकांना जेलमध्ये पाठवण्यात आले. शुक्रवारी कुख्यात दरोडेखोराच्या स्थानीक गुन्हे शाखेने मुसक्या आवळून त्यास जेरबंद केले आहे.
दिनांक 20.06.2025 रोजी महादेव भगवान दळवे वय 54 वर्ष, रा बालेपीर बीड यांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे फिर्याद दिली की, त्याचे राहते घरासमोरुन दुचाकी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी हॅन्डल लॉक तोडुन चोरुन नेली आहे. या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या दाखल गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आणण्याचे प्रयत्न सुरु केले व दिनांक 20.06.2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, हा गुन्हा अतुल विक्रम वाघमारे याने केला. आरोपी अतुल विक्रम वाघमारे हा संभाजीनगर, बीड येथील किरायच्या राहत्या घराचे जवळ थांबला आहे. या माहीती वरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने छापा मारून पकडले. त्याचे ताब्यातुन वेगवेगळ्या कंपणीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सदर मोटार सायकल बाबत विचारणा केली असता सदरील मोटार सायकली हया बीड परीसरात वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरल्या आहेत.
असे आरोपीने सांगीतले त्यापैकी होंडा कंपणीचे शाईन दुचाकी आम्ही खात्री केली असता, ही मोटार सायकल पोलीस ठाणे शिवाजीनगार गुर.नं 341/2025 कलम 303(2) बी.एन.एस मधील असल्याची खात्री झाली. आरोपीने एकुण पाच मोटार सायकली चोरल्याचे कबुल केले. आरोपी व पाच दुचाकी पुढील तपासकामी पोलीस ठाणे शिवाजीनगर यांचे ताब्यात दिले आहेत. आरोपी अतुल विक्रम वाघमारे याचेवर दरोडेसारखे बरेच गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अभिलेखावरुन दिसुन आले.
ही कारवाई नवनित काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक, बीड, शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारोती कांबळे, विकास राठोड, भागवत शेलार, दिपक खांडेकर, आशपाक शेख, चालक संजय जायभाये यांनी केली आहे






