‘

मुंबई, (रिपोर्टर)ः- राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याजाने दहा हजार रुपयापासून एक लाखापर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देणारी योजना मुंबई जिल्हा बॅँकेने जाहीर केली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार्या महिलांच्या गटालादेखील दहा लाखापर्यंत कर्ज देण्याची तयारी मुंबई बँकेची असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली. सध्या ही योजना मुंबईतच राबविली जाणार असून राज्यात इतरत्र ही योजना राबविण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकार दर महिन्याला तीन हजार 570 कोटी रुपये खर्च करते. जवळपास दोन कोटी 47 लाख महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत दिला जातो. महिलांनी उद्योगात उतरले तर हा निधी पुन्हा बाजारात येऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि महिलांना देखील आर्थिक उत्पन्नाचे साधन मिळेल.’








