
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहणार
मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- मुफ्ती अन्वर नोमानी
बीड (रिपोर्टर)ः- केंद्र सरकारने वक्फ विरोधात बील मंजूर करण्यात आले आहे. हे बील रद्द करण्यात यावे या मागणीसाठी ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या वतीने वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करण्यात येत आहे. बीड येथे रविवार दि. 29 जून रोजी निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना खालीद सैफुला रहेमानी त्यांच्यासह आदि मार्गदर्शन करणार आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मजलीसे उलेमा ए हिंदचे जिल्हा सचिव मुफ्ती मोहम्मद अन्वर नोमानी यांनी केले आहे.

काही महिन्यापूर्वी केंद्र सरकारने वक्फ विरोधात बिल आणले हे बील रद्द करावे या मागणीसाठी वक्फ बचाव कमीटी व ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्यावतीने वेगवेगळ्या पध्दतीचे आंदोलन करण्यात येत आहे. 29 जून रोजी रविवारी बीड शहरातील इज्तेमा मैदान मोमीनपूरा बायपास रोड बीड या ठिकाणी दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डचे राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना खालीद सैफुला साहब रहेमानी व राष्ट्रीय सचीव हजरत मौलाना उमरैन महेफुज रहेमानी यांच्यासह आदि मार्गदर्शन करणार आहे. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मजलिस ए उलेमा ए हिंदचे जिल्हा सचिव मुफ्ती महोम्मद अन्वर साहाब नोमानी यांनी केले आहे. या सभेचे आयोजन मजलिस ए उलेमा बीड, वक्फ बचाव कमीटी जिल्हा बीड च्यावतीने करण्यात आले आहे.






