उपळी फाटा येथील घटना; वडवणी पोलिसात चार पुरुष, दोन महिलावर गुन्हा दाखल
वडवणी (रिपोर्टर):- शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत माजलगावच्या रहिवासी असणार्या 61 वर्षीय सेवानिवृत्त पीएसआयला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना दि. 21 जून रोजी दुपारी 12 वाजता उपळी फाटा येथील शेतात घडली असून रात्री उशिरा वडवणी पोलिसात चार पुरुषासह दोन महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
माजलगाव येथील शिक्षक कॉलनी रहिवासी असणारे अर्जुन मनोहरराव पवार वय 61 वर्ष सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक असं मारहाण झालेल्या सेवानिवृत्त पीएसआय यांचे नाव आहे. दिनांक 21 जून रोजी दुपारी 12 वाजता उपळी फाटा येथील गट नं.19 या शेतामध्ये सेवानिवृत्त पीएसआय गेले असता तेथील शेती वरून वाद झाला. या वादामध्ये त्यांना लोखंडी रॉडने डाव्या पायाच्या घोट्याच्या वर मारून पाय फ्रॅक्चर केला. तसेच नडगीवर व उजव्या पायाच्या मांडीवर, नडगीवर, पोटावर मुक्कामार देऊन जखमी केले आहे. ही मारहाण बाबी तांडा नं.2 येथील रहिवासी असणारे रामेश्वर भानुदास राठोड, राजेश चंदू राठोड, अनिल ज्ञानोबा राठोड, चंदू हिरामण राठोड व नाव माहित नसलेल्या दोन महिला यांनी मारहाण केली आहे. या आरोपी विरोधात सेवानिवृत्त पीएसआय अर्जुन पवार यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात वडवणी पोलिसात रात्री उशिरा गुरनं 169/2025 कलम 118(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, 351(2), 351(3), बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप पर्यंत आरोपींना अटक करण्यात आली नाही अशी माहिती वडवणी पोलीस स्टेशनच्या ठाणेप्रमुख वर्षा व्हगाडे मॅडम यांनी दिली आहे.








